लोकमत बालविकास मंचतर्फे ‘माझा बाप्पा-माझी आरास’ स्पर्धेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:30 AM2021-09-14T04:30:30+5:302021-09-14T04:30:30+5:30

सांगली : ‘लोकमत’तर्फे जिल्ह्यातील सर्व गणेशभक्तांसाठी घरगुती गौरी-गणपती आरास सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. लोकमत बालविकास मंचने आयोजन केले ...

Lokmat Bal Vikas Manch organizes 'Mazha Bappa-Majhi Aras' competition | लोकमत बालविकास मंचतर्फे ‘माझा बाप्पा-माझी आरास’ स्पर्धेचे आयोजन

लोकमत बालविकास मंचतर्फे ‘माझा बाप्पा-माझी आरास’ स्पर्धेचे आयोजन

googlenewsNext

सांगली : ‘लोकमत’तर्फे जिल्ह्यातील सर्व गणेशभक्तांसाठी घरगुती गौरी-गणपती आरास सजावट स्पर्धा आयोजित केली आहे. लोकमत बालविकास मंचने आयोजन केले असून ‘माझा बाप्पा- माझी आरास’ स्पर्धेत आकर्षक बक्षिसे ठेवली आहेत.

सहभागासाठी संपूर्ण जिल्हाभरातून गणेशभक्त आणि सखी सहभागी होऊ शकतात स्पर्धकांनी आपल्या गौरी- गणपतीच्या आरास सजावटीचे फोटो लोकमत इव्हेंटस, कोल्हापूर, सांगली, सातारा या फेसबुक पेजवर शेअर करावेत. तत्पूर्वी पेज लाईक करायला हवे. ही स्पर्धा सांगली जिल्ह्यासाठीच मर्यादित आहे. निकालासाठी परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. एक स्पर्धक एकच फोटो पाठवू शकतो. फोटो पोस्ट करताना संपूर्ण नाव, संपर्क क्रमांक, शहर आदी तपशील अवश्य नोंदवावा. १० सप्टेंबरपासून १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत सहभाग नोंदवता येईल. या कालावधीत फोटोला मिळालेले लाईक्स व सहभाग ग्राह्य धरला जाईल. स्पर्धेचा निकाल २० सप्टेंबरनंतर लोकमत इव्हेंटस कोल्हापूर, सांगली, सातारा या फेसबुक पेजवर जाहीर करण्यात येईल. स्पर्धेसंदर्भातील सर्व अधिकार आयोजकांंकडे राखीव असतील. स्पर्धेत मिळालेल्या एकूण लाईक्सनुसार पाच विजेते आणि परीक्षणानुसार पाच विजेते निवडण्यात येतील. विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसे अशी : प्रथम क्रमांक - चांदीची गणेशमूर्ती, द्वितीय क्रमांक - १० ग्राम चांदीचे नाणे, तृतीय क्रमांक - पाच ग्राम चांदीचे नाणे. तसेच उत्तेजनार्थ चार बक्षिसे देण्यात येणार आहेत. आपल्या गौरी-गणपतीची आरास व सजावटीचे फोटो फेसबुक पेजवर पोस्ट करून स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

चाैकट

उत्कर्षतर्फे आकर्षक बक्षिसे

सांगलीतील मारुती रस्त्यावरील उत्कर्ष भोजनालय म्हणजे खवय्या सांगलीकरांचे आवडते ठिकाण. भोजनालयाचे संचालक पै. विजय खेत्रे यांनी कोरोना, महापूर काळात मोठे मदत कार्य केले. याशिवाय वर्षभर सातत्याने ते वेगवेगळ्या समाजोपयोगी उपक्रमांत सहभागी असतात. शहरातील अनेक सेवाभावी व सामाजिक संस्थांच्या वाटचालीत विजय खेत्रे यांचा सिंहाचा वाटा आहे. स्पर्धेसाठी उत्कर्षतर्फे विविध बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत.

Web Title: Lokmat Bal Vikas Manch organizes 'Mazha Bappa-Majhi Aras' competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.