सर्वाधिक लांब शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी; १२ जिल्हे जोडणार
By संतोष भिसे | Published: February 10, 2024 07:31 AM2024-02-10T07:31:54+5:302024-02-10T07:32:18+5:30
प्रकल्पाचा अहवाल सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी सप्टेंबर २०२२ मध्ये दिले होते.
संतोष भिसे
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोल्हापूर, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, नृसिंहवाडी आदी तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाच्या अंतिम आराखड्यास शासनाने बुधवारी मान्यता दिली. ८०५ किलोमीटर लांबीचा हा मार्ग पवनार (जि. वर्धा) येथून सुरू होऊन पत्रादेवीला (जि. सिंधुदुर्ग) संपणार आहे. यानिमित्ताने राज्यात आणखी एक महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्प साकारणार आहे. प्रकल्पाचा अहवाल सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी सप्टेंबर २०२२ मध्ये दिले होते.
समृद्धीपेक्षा लांब शक्तिपीठ
समृद्धी महामार्ग
७०१
किलोमीटर लांबीचा आहे. नव्याने प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग त्यापेक्षा जास्त लांबीचा म्हणजे
८०५
किलोमीटरचा असेल. अर्थात, हा मार्ग राज्यातील सर्वांत लांब महामार्ग असेल.
शक्तिपीठे जोडली जाणार
nया महामार्गामुळे माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, अंबाजोगाई ही तीर्थक्षेत्रे जोडली जाणार आहेत.
n१२ ज्योतिर्लिंगांपैकी औंढा नागनाथ व परळी वैजनाथ येथील शक्तिपीठे, पंढरपूर, अक्कलकोट, गाणगापूर, कारंजा (लाड), नृसिंहवाडी, औदुंबर ही धार्मिक स्थळेही जोडली जाणार आहेत.
असा जाईल महामार्ग
महामार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग असा १२ जिल्ह्यांतून प्रवास करणार आहे.
पुढे गोवा आणि महाराष्ट्राच्या सरहद्दीवर कोकण द्रुतगती महामार्गाला जोडला जाईल.