शिराळा तालुक्यात वादळाच्या तडाख्याने लाखोंचे नुकसान-पंचनाम्यांबाबत उदासीनता-आंबे गळून पडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 01:14 PM2019-04-15T13:14:01+5:302019-04-15T13:14:39+5:30
शिराळा तालुक्यात शनिवारी सायंकाळी अनेक ठिकाणी वादळी पावसाने झोडपले. अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले. तसेच वादळी पाऊस व गारांच्या वर्षावामुळे आंबा बागायतदार शेतकºयांचे आंबे गळून पडले
शिराळा : शिराळा तालुक्यात शनिवारी सायंकाळी अनेक ठिकाणी वादळी पावसाने झोडपले. अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेल्याने नुकसान झाले. तसेच वादळी पाऊस व गारांच्या वर्षावामुळे आंबा बागायतदार शेतकºयांचे आंबे गळून पडले. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेला २४ तास उलटून गेले तरी पंचनामे केले नसल्यामुळे शेतकरी नाराजी व्यक्त करीत आहेत. पंचनामे लवकर करावेत, अशी मागणी आंबा -झेंडू बागायतदार शेतकºयांनी केली आहे.
कापरी (ता. शिराळा) येथील आनंदा शंकर पाटील, विलास जगन्नाथ पाटील, जयसिंग केशव पाटील या तिघांची चार एकर आंबा बाग, तर रिळे (ता. शिराळा) येथील महादेव मारूती मस्के तीन एकर, रामचंद्र ईश्वरा पाटील यांची दीड एकर, लक्ष्मण बंडू पाटील यांची साडेपाच एकर, तुकाराम चंद्रू पाटील यांची एक एकर, बाळू चंद्रू पाटील यांची एक एकर, बळीराम नामदेव कुंभार यांची एक एकर, राजाराम पांडुरंग पाटील, वसंत ज्ञानू पाटील व खेड (ता. शिराळा) येथील दगडू शंकर नाईक, भास्कर निवृत्ती पाटील, विष्णू नाना पाटील, रंगराव नाना पाटील, शंकर नाना पाटील, पंडित पांडुरंग पाटील, मानसिंग पांडुरंग पाटील, शिराळा येथील फिरोज गौस मुल्ला व भाटशिरगाव (ता. शिराळा) येथील पांडुरंग तुकाराम माने यांची ३० गुंठे आदींसह शेतकºयांच्या जवळपास ३० एकरामधील आंब्याचे नुकसान झाले.
खेड (ता. शिराळा) येथील महादेव तुकाराम माळी यांच्या तोड चालू झालेल्या काकडीच्या जवळपास दीड एकरातील शेतीतील काकडीचे वेल गारांमुळे तुटल्याने दीड लाखाचे, तर अशोक आत्माराम माळी यांच्या एक एकरातील झेंडूच्या बागेचे जवळपास एक लाखाचे, आबासाहेब शंकर खबाले व विकास वसंत खबाले यांच्या काढावयास आलेल्या मका पिकाचे नुकसान झाले. त्याचबरोबर येथील जयसिंग बाळू माळी यांच्या घराचा पत्रा उडून गेल्याने जवळपास ४० हजाराचे, तर बिऊर (ता. शिराळा) येथील गणपती मारुती पाटील यांच्या घरावरील पत्रा उडून गेल्यामुळे व सिमेंटचा पत्रा फुटल्यामुळे ७० हजाराचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने याचे पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे.