आवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पुर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 01:05 PM2019-11-09T13:05:05+5:302019-11-09T13:12:48+5:30
जिल्ह्यातील 10 तालुक्यातील 573 बाधितगावातील 1 लाख 25 हजार 68 शेतकऱ्यांचे 3 लाख 77 हजार 119.70 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 65 हजार 267 हेक्टर बाधित झाले असून त्यापैकी 95 हजार 881 शेतकऱ्यांचे 54 हजार 59.71 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पुर्ण झाले आहेत.
सांगली : माहे ऑक्टोंबर मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानींचे पंचनामे सुरु असुन जिल्ह्यातील 10 तालुक्यातील 573 बाधितगावातील 1 लाख 25 हजार 68 शेतकऱ्यांचे 3 लाख 77 हजार 119.70 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 65 हजार 267 हेक्टर बाधित झाले असून त्यापैकी 95 हजार 881 शेतकऱ्यांचे 54 हजार 59.71 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पुर्ण झाले आहेत.
11 हजार 207.29 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे प्रलंबित आहेत. त्यांचेही पंचनामे गतीने करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.
पंचानाम्याची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे तासगाव तालुक्यातील 69 बाधित गावातील 68 हजार 209 शेतकऱ्यांचे 43 हजार 277 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 34 हजार 104 हेक्टर बाधित झाले असून त्यापैकी 47 हजार 380 शेतकऱ्यांचे 25 हजार 97 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पुर्ण झाली असून 9 हजार 7 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे प्रलंबित आहेत. तालुक्यातील बाधित शेतकऱ्यापैकी 19 हजार 853 शेतकरी विमा संरक्षीत असून उर्वरित 48 हजार 356 शेतकऱ्यांचे विमा संरक्षण नाही.
आटपाडी तालुक्यातील 37 बाधितगावातील 598 शेतकऱ्यांचे 9315.30 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 356.50 हेक्टर बाधित झाले असून 4025 शेतकऱ्यांचे 2429.60 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पुर्ण झाली आहेत. तालुक्यातील बाधित शेतकऱ्यापैकी 32 शेतकरी विमा संरक्षीत असून उर्वरित 566 शेतकऱ्यांचे विमा संरक्षण नाही.
पलूस तालुक्यातील 36 बाधित गावातील 772 शेतकऱ्यांचे 19 हजार 988 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 317.80 हेक्टर बाधित झाले असून त्यापैकी 2023 शेतकऱ्यांचे 1112.24 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पुर्ण झाली आहेत.
खानापूर तालुक्यातील 66 बाधितगावातील 19 हजार 512 शेतकऱ्यांचे 36 हजार 689 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 9125 हेक्टर बाधित झाले असून त्यापैकी 10 हजार 946 शेतकऱ्यांचे 5655.64 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पुर्ण झाली असून 3469.36 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे प्रलंबित आहेत. तालुक्यातील बाधित शेतकऱ्यापैकी 8806 शेतकरी विमा संरक्षीत असून उर्वरित 10 हजार 706 शेतकऱ्यांचे विमा संरक्षण नाही.
कडेगाव तालुक्यातील 56 बाधितगावातील 1145 शेतकऱ्यांचे 38 हजार 455 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 447 हेक्टर बाधित झाले असून त्यापैकी 5495 शेतकऱ्यांचे 2012.02 हेक्टर क्षेत्राचे यपंचनामे पुर्ण झाली आहेत.
वाळवा तालुक्यातील 44 बाधितगावातील 1778 शेतकऱ्यांचे 66 हजार 768 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 729.20 हेक्टर बाधित झाले असून त्यापैकी 3010 शेतकऱ्यांचे 1394.59 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पुर्ण झाली असून तालुक्यातील बाधित शेतकऱ्यापैकी 146 शेतकरी विमा संरक्षीत असून उर्वरित 1632 शेतकऱ्यांचे विमा संरक्षण नाही.
कवठेमहांकाळ तालुक्यातील 60 बाधितगावातील 16 हजार 425 शेतकऱ्यांचे 24 हजार 157.40 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 10 हजार 990.30 हेक्टर बाधित झाले असून त्यापैकी 13 हजार 304 शेतकऱ्यांचे 8389 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पुर्ण झाली असून 2601.30 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे प्रलंबित आहेत. तालुक्यातील बाधित शेतकऱ्यापैकी 8662 शेतकरी विमा संरक्षीत असून उर्वरित 7763 शेतकऱ्यांचे विमा संरक्षण नाही.
जत तालुक्यातील 72 बाधितगावातील 8940 शेतकऱ्यांचे 65 हजार 815 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 4125.50 हेक्टर बाधित झाले असून त्यापैकी 2915 शेतकऱ्यांचे 3456.90 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पुर्ण झाली असून 668.60 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे प्रलंबित आहेत. तालुक्यातील बाधित शेतकऱ्यापैकी 15 शेतकरी विमा संरक्षीत असून उर्वरित 8925 शेतकऱ्यांचे विमा संरक्षण नाही.
शिराळा तालुक्यातील 61 बाधितगावातील 442 शेतकऱ्यांचे 32 हजार 099 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 73.30 हेक्टर बाधित झाले असून त्यापैकी 623 शेतकऱ्यांचे 92.70 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पुर्ण झाली आहेत.
मिरज तालुक्यातील 72 बाधितगावातील 7247 शेतकऱ्यांचे 40 हजार 556 हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 4998.40 हेक्टर बाधित झाले असून त्यापैकी 6160 शेतकऱ्यांचे 4420.02 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पुर्ण झाली असून 578.38 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे प्रलंबित आहेत. तालुक्यातील बाधित शेतकऱ्यापैकी 211 शेतकरी विमा संरक्षीत असून उर्वरित 7036 शेतकऱ्यांचे विमा संरक्षण नाही.
जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यापैकी 37725 शेतकरी विमा संरक्षीत असून उर्वरित 93125 शेतकऱ्यांचे विमा संरक्षण नाही.