तांदूळवाडी परिसरात डोंगरचा मेवा लुप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:20 AM2021-05-29T04:20:32+5:302021-05-29T04:20:32+5:30
तांदूळवाडी : तांदूळवाडी (ता. वाळवा) परीसरात ‘डोंगरची मैना खायाला फैना’ असा कोकणवासीय महिला व पुरुषांचा ...
तांदूळवाडी : तांदूळवाडी (ता. वाळवा) परीसरात ‘डोंगरची मैना खायाला फैना’ असा कोकणवासीय महिला व पुरुषांचा आवाज दोन वर्षे थांबला आहे. लहान मुलांच्या बरोबरीने सर्वजणांना हवीहवेशी वाटणारी करवंद आज शोधण्याची वेळ आली आहे.
तांदूळवाडी परीसरात कुंडलवाडी, मालेवाडी, बहादूरवाडी, कोरेगाव, भडकंबे, नागाव, कणेगाव, भरतवाडी या गावांमध्ये दहा वर्षांपासून कोकणातील शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर व अन्य गावे, शिराळा तालुक्यातील वारणावती परिसरातील महिला व पुरुष डोंगरातील करवंद, जांभळे विकण्यासाठी येथे येत होते. लोक आवडीने घेत होते पण मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये कोरोना संकटाने तोंड वर काढल्याने ‘डोंगरची मैना खायाला फैना, करवंदेऽऽ’ अशी आरोळी देत गल्लोगल्ली फिरणारे व त्यांच्यावर उपजीविका साधणारे बंद झाल्यामुळे लहानांबरोबर सर्वांना त्यांना शोधण्याची वेळ आली आहे.