अनुदानित बियाणांसाठी जिल्ह्यात तीन हजार अर्जांतून १३१३ शेतकऱ्यांना लॉटरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:20 AM2021-06-05T04:20:51+5:302021-06-05T04:20:51+5:30

सांगली : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात मिळणाऱ्या बियाणांसाठी व प्रात्यक्षिकासाठी केलेल्या अर्जांपैकी निम्म्याहून कमीजणांना त्याचा लाभ ...

Lottery for 1313 farmers out of 3,000 applications in the district for subsidized seeds | अनुदानित बियाणांसाठी जिल्ह्यात तीन हजार अर्जांतून १३१३ शेतकऱ्यांना लॉटरी

अनुदानित बियाणांसाठी जिल्ह्यात तीन हजार अर्जांतून १३१३ शेतकऱ्यांना लॉटरी

Next

सांगली : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात मिळणाऱ्या बियाणांसाठी व प्रात्यक्षिकासाठी केलेल्या अर्जांपैकी निम्म्याहून कमीजणांना त्याचा लाभ मिळाला आहे. कृषिविषयक योजनांचा लाभ एकाच संकेतस्थळावरून मिळावा, यासाठी महाडीबीटी पोर्टलवरून अर्ज मागविण्यात आले होते. त्यात २९५२ जणांनी अर्ज केले, तर त्यातील १३१३ शेतकऱ्यांना लॉटरी लागली आहे.

सवलतीच्या दरात सोयाबीन, मुगासह इतर कडधान्य मिळण्यासाठी महाडीबीटी या पोर्टलवर एकात्मिक संगणक प्रणालीद्वारे बियाणे घटकांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. याची सोडत नुकतीच पूर्ण करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील प्रमाणित बियाणे व प्रात्यक्षिके या दोन घटकांसाठी अर्ज दाखल झाले होते. यानुसार मदत करण्यात आली आहे. एकूण २९५१ जणांनी अर्ज केले. त्यात प्रमाणित बियाणांसाठी १०८०, तर प्रात्यक्षिकांसाठी २३३ जणांची लॉटरीमध्ये निवड झाली आहे. यात जत तालुक्यातील शेतकऱ्यांचा अधिक समावेश आहे.

चौकट

अनुदानित बियाणांसाठी आलेले अर्ज : २९५१

लॉटरी किती जणांना : १३१३

चौकट

अनुदानावर मिळणार बियाणे

शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असलेल्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना अनुुदानावर बियाणांची उपलब्धता व्हावी व त्यांना खरेदी करणेे सोयीचे व्हावे यासाठी ही प्रणाली राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अन्नधान्याच्या उत्पादन वाढीसाठीही याचा उपयोग होत आहे.

चौकट

बियाणांसाठी तालुकानिहाय अर्ज व लाभार्थी...

मिरज ३१० १२२

वाळवा १३७ २७०

शिराळा ५ ७

तासगाव १४६ २७८

कडेगाव १९ ११६

विटा २४ ४१

पलूस ६ ४७

आटपाडी ८४ १२०

जत ५०८ १२६६

कवठेमहांकाळ २६२ ४९६

चौकट

महागडे बियाणे कसे परवडणार?

कोट

शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात बियाणे मिळणार, यामुळे दिलासा मिळाला होता. मात्र, अर्ज करूनही यादीत नाव आले नाही. बाजारपेठेत बियाणांचे दर जादा असल्याने पोर्टलवर नोंदणीनंतर बियाणे मिळतील, अशी अपेक्षा होती.

- जयवंत खोत, शेतकरी

कोट

आमचे वर्षभरात खरीप हंगामावरच नियोजन असते. पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर बियाणे कमी दराने मिळतील अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार अर्ज केला. मात्र, नंबर आला नाही. शासनाने लाभार्थी निवड संख्येत वाढ करावी, जेणेकरून अधिकजणांना लाभ मिळेल.

- किरण ढोले, शेतकरी

कोट

पोर्टलवरील नोंदणीत बियाणे मिळाले नसल्याने आता विकतच्या बियाणांचा अथवा घरातील साठवून ठेवलेल्या बियाणांचा वापर करावा लागणार आहे. शासनाने कोटा वाढवून द्यावा.

- उदय पाटील, शेतकरी

Web Title: Lottery for 1313 farmers out of 3,000 applications in the district for subsidized seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.