Crime News Sangli: एकुंडीत प्रेमीयुगुलाची आत्महत्या, तरुणीचे सहा दिवसांपूर्वी झाले होते लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2022 07:19 PM2022-06-07T19:19:08+5:302022-06-07T19:19:08+5:30

लक्ष्मण शिंदे आणि अश्विनी माळी यांचे प्रेमसंबंध होते. घरच्यांनी मनाविरोधात लग्न करुन दिल्याने अश्विनी नाराज होती. अश्विनी व लक्ष्मण यांनी एकमेकांना फोन करून आपापल्या घरी विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली

lovers suicide in Ekundi, the young woman was married six days ago | Crime News Sangli: एकुंडीत प्रेमीयुगुलाची आत्महत्या, तरुणीचे सहा दिवसांपूर्वी झाले होते लग्न

Crime News Sangli: एकुंडीत प्रेमीयुगुलाची आत्महत्या, तरुणीचे सहा दिवसांपूर्वी झाले होते लग्न

googlenewsNext

जत : जत तालुक्यातील एकुंडी येथे प्रेमीयुगुलाने विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. अश्विनी गजानन माळी (वय २२, रा. एकुंडी, ता. जत, सध्या रा. सलगरे, ता. मिरज) व लक्ष्मण संभाजी शिंदे (२१, रा. एकुंडी, ता. जत) अशी मृत प्रेमीयुगुलाची नावे आहेत. एकमेकांना फोन करून दोघांनीही एकुंडी येथील आपापल्या घरी विष पिऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.

एकुंडी येथील लक्ष्मण शिंदे आणि अश्विनी माळी यांचे प्रेमसंबंध होते. मात्र ते घरच्यांना पसंत नव्हते. अश्विनीच्या घरच्यांनी तिचा विवाह सलगरे येथील तरुणाशी एक जूनला करून दिला होता. मात्र तिला लग्न पसंत नसल्याने ती नाराज होती, अशी गावात चर्चा आहे. ती लग्नानंतर रविवारीच (दि, ५) एकुंडी येथे माहेरी आली होती.

सोमवारी सकाळी अश्विनी व लक्ष्मण यांनी एकमेकांना फोन करून आपापल्या घरी विषारी द्रव्य पिल्याचा अंदाज आहे. सकाळी साडेसातच्या दरम्यान अश्विनी व लक्ष्मणला अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने त्यांना नातेवाइकांनी खासगी रुग्णालयात नेले. मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर शवविच्छेदनासाठी त्यांचे मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. या दोन्ही घटनांची नोंद जत पोलीस ठाण्यात झाली आहे.

Web Title: lovers suicide in Ekundi, the young woman was married six days ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.