जिल्ह्यात सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:23 AM2021-01-04T04:23:33+5:302021-01-04T04:23:33+5:30
सांगली : गेल्या पाच महिन्यांतील सर्वात कमी कोरोना बाधितांची नोंद रविवारी झाली. नव्या अकराजणांना कोरोनाचे निदान होताना १८ जणांनी ...
सांगली : गेल्या पाच महिन्यांतील सर्वात कमी कोरोना बाधितांची नोंद रविवारी झाली. नव्या अकराजणांना कोरोनाचे निदान होताना १८ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर सांगली शहरात एका मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोनाच्या उतारामुळे दिलासा कायम आहे.
आतापर्यंत सर्वात कमी १२ रुग्णांची नोंद झाली हाेती. रविवारी पुन्हा त्यात घट होत ११ नव्या रुग्णाची नाेंद झाल्याने गेल्या पाच महिन्यांतील सर्वात कमी बाधितांची संख्या ठरली आहे. महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात कडेगाव, कवठेमहांकाळ, खानापूर, मिरज, पलूस आणि शिराळा तालूक्यात एकही नवा रुग्ण आढळलेला नाही.
आरोग्य विभागाच्यावतीने रविवारी आरटीपीसीआर अंतर्गत ३२२ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात दोघांना कोरोनाचे निदान झाले आहे. तर रॅपिड ॲन्टिजेनच्या ५९१ चाचण्यांमधून ९ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
उपचार घेत असलेल्या १८४ रुग्णांपैकी ४४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यातील ३७ जण ऑक्सिजनवर तर ७ जण व्हेंटीलेटरवर उपचार घेत आहेत.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित ४७६३८
उपचार घेत असलेले १८४
कोरोनामुक्त झालेले ४७६३८
आतापर्यंतचे एकूण मृत्यू १७३४
रविवारी दिवसभरात
जत ६
आटपाडी, वाळवा प्रत्येकी २
तासगाव १