एम.आय.डी.सी.तील समस्या सोडवून मूलभूत सुविधा द्या : डॉ. अभिजीत चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2019 04:08 PM2019-06-28T16:08:17+5:302019-06-28T16:10:14+5:30

सांगली मिरज कुपवाड परिसरातील एम. आय. डी. सी. क्षेत्रात अंतर्गत रस्ते, प्रलंबित सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, खोक्यांचे अतिक्रमण, कचरा संकलन, वीजप्रश्न, पथदिवे, फायर स्टेशन यासह अनेक समस्या प्रलंबित आहेत. औद्योगिक वसाहतीमधील अशा समस्यांची सोडवणूक करून उद्योजकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा उद्योग मित्र समिती, जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

M. Income. D. C. Give basic amenities to solve problems in the field- Dr. Abhijit Chaudhary | एम.आय.डी.सी.तील समस्या सोडवून मूलभूत सुविधा द्या : डॉ. अभिजीत चौधरी

एम.आय.डी.सी.तील समस्या सोडवून मूलभूत सुविधा द्या : डॉ. अभिजीत चौधरी

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हा उद्योग मित्र समितीच्या बैठकीत निर्देशकुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करा, अतिक्रमणे काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्या

सांगली : सांगली मिरज कुपवाड परिसरातील एम. आय. डी. सी. क्षेत्रात अंतर्गत रस्ते, प्रलंबित सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, खोक्यांचे अतिक्रमण, कचरा संकलन, वीजप्रश्न, पथदिवे, फायर स्टेशन यासह अनेक समस्या प्रलंबित आहेत. औद्योगिक वसाहतीमधील अशा समस्यांची सोडवणूक करून उद्योजकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा उद्योग मित्र समिती, जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, मिरज व कुपवाड एमआयडीसीमधील खोक्यांच्या अतिक्रमणाचा प्रश्न बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे. तरी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या मदतीने अतिक्रमणे काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घ्यावी. ही मोहीम ठराविक कालावधीसाठी न ठेवता, तिच्याच सातत्य असावे. अतिक्रमणे काढण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. तसेच, फायर स्टेशन ही मूलभूत सेवा आहे. त्यामुळे मिरज एमआयडीसी तील फायर स्टेशन सुरू करण्यासाठी महानगरपालिकेने १५ दिवसात कार्यवाही करावी. तसेच, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाबाबत एमआयडीसीने प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सूचित केले.

इज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत उद्योगासाठी आवश्यक जमिनीचे अकृषक परवाने विहित वेळेत देण्यासाठी कार्यवाही करावी, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, औद्योगिक क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळ आवश्यक आहे. कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी व रोजगार उपलब्धतेसाठी औद्योगिक संघटनांनी प्रशिक्षण केंद्र सुरू करावे. यासाठी उद्योजकांनी जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी समन्वय ठेवावा. प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित होण्यासाठी अधिकाधिक गतीने प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

बैठकीस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी स्वाती शेंडे आणि कार्यकारी अभियंता श्री. सनदी, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक नितीन कोळेकर, व्यवस्थापिका विद्या कुलकर्णी, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक संचालक संजय माळी, महानगरपालिका विद्युत अभियंता अमर चव्हाण, उपअभियंता आर. डी. सूर्यवंशी, शहर अभियंता एम. डी. पाटील, मिरज एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष संजय अराणके, कृष्णा व्हॅली असोसिएशनचे कुटुंबप्रमुख शिवाजी पाटील आणि अध्यक्ष सतीश मालू, उपाध्यक्ष रमेश आरवाडे, वसंतदादा औद्योगिक वसाहत सहकारी संस्थेचे अध्यक्ष सचिन पाटील, गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहतीचे संतोष भावे, खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या सांगली जिल्हा समितीचे अध्यक्ष परशुराम नागरगोजे यांच्यासह समितीचे सदस्य, उद्योजक आणि अन्य संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत मिरज एमआयडीसीमधील फायर स्टेशन सुरू करण्याबाबत, कुपवाड एम.आय.डी.सी. मधील वृक्षारोपणासाठी दिलेले खुले प्लॉट परत घेवून छोट्या उद्योजकांना देण्याबाबत, सांडपाणी प्रकल्प व्यवस्थापन, मिरज एम.आय.डी.सी. क्षेत्रात रस्त्यावर गतिरोधक करण्याबाबत आणि खोक्यांचे अतिक्रमण काढणे, नवीन जलवाहिनी जोडणी घेण्यासाठी लागणाऱ्या साहित्य व इतर खर्चाबाबत, वीज मीटर उपलब्धता, औद्योगिक अकृषक परवाने तातडीने देण्याबाबत, वैद्यकीय खर्चाची प्रतीपूर्ती ईएसआयसी कडून होणेबाबत, मिरज एम.आय.डी.सी. मधील कचरा उचलणेबाबत, औद्योगिक वसाहतीमधील महानगरपालिका संबंधित रस्त्यांच्या कामांबाबत सविस्तरपणे चर्चा करून संबंधितांना योग्य ते निर्देश देण्यात आले. तसेच जिल्ह्यातील सर्व औद्योगिक उपक्रमामध्ये किमान ८० टक्के स्थानिक उमेदवारांना नोकरीमध्ये समाविष्ट करण्याबाबत सूचित करण्यात आले.

स्वागत विद्या कुलकर्णी यांनी केले. बैठकीचे विषयवाचन नितीन कोळेकर यांनी केले. प्रारंभी जिल्हा उद्योग केंद्र व औद्योगिक संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांचे स्वागत करण्यात आले. तसेच, उद्योजक सतीश मालू यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

 

Web Title: M. Income. D. C. Give basic amenities to solve problems in the field- Dr. Abhijit Chaudhary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.