मे. पु. ना. गाडगीळ सराफ आणि ज्वेलर्सचे यशवंत शंकर तथा बाबुदादा गाडगीळ यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2018 03:47 PM2018-02-12T15:47:53+5:302018-02-12T15:48:24+5:30
मे. पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ आणि ज्वेलर्स या सुवर्ण पेढीचे जेष्ठ संचालक यशवंत शंकर तथा बाबुदादा गाडगीळ यांचे १२ फेब्रुवारी रोजी सांगली येथे निधन झाले
सांगली : मे. पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ आणि ज्वेलर्स या सुवर्ण पेढीचे जेष्ठ संचालक यशवंत शंकर तथा बाबुदादा गाडगीळ यांचे १२ फेब्रुवारी रोजी सांगली येथे निधन झाले. ते ८८ वर्षाचे होते. सांगली सराफ असोशिएशनचे ते अनेक वर्ष अध्यक्ष होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी संघचालक म्हणून सांगली शहराचे २० वर्ष काम पहात होते. टिळक स्मारक मंदिराचे ते विश्वस्थ होते. राष्ट्रीय संघटन मंडळाचे अध्यक्ष, वनवासी कल्याण आश्रम, मेघालय वसतिगृह जनकल्याण समिती यांचे संचालक तसेच संघाच्या अनेक समित्यावर कार्यरत होते. सांगली शिक्षण संस्थेचे ते तर आधारस्थंभ होते. मृदुभाषिक व शांत स्वभावाचे बाबुदादा कायम सायकलवरून भ्रमंती करत असत. अफाट जनसंपर्क हे त्यांचे वैशिष्ट होते. अनेक गरजूंना त्यांनी मदत केली होती. पेढीचे कामकाज ते अखेर पर्यंत पहात होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुमनताई गाडगीळ, चुलत बंधू आमदार सुधीरदादा, सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेशकाका, चिरंजीव मिलिंद, पराग, डॉ. अनिरुद्ध गाडगीळ, एक कन्या, सुना, नातवंडे असा मोठा परीवार आहे. रक्षाविसर्जन बुधवार दि.१४ फेब्रुवारी सकाळी ९ वाजता अमरधाम स्मशानभूमीत होईल. याच दिवशी सायंकाळी ५ वाजता श्रद्धांजलीचा कार्यक्रम टिळक स्मारक मंदिर येथे होणार आहे.