माडग्याळला आरोग्य केंद्रात शववाहिका देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:26 AM2021-05-11T04:26:46+5:302021-05-11T04:26:46+5:30
माडग्याळ : माडग्याळ (ता. जत) येथील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात जनरेटर व शववाहिकेसह विविध साहित्यांची पूर्तता करणार ...
माडग्याळ
: माडग्याळ (ता. जत) येथील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात जनरेटर व शववाहिकेसह विविध साहित्यांची पूर्तता करणार असल्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
आमदार सावंत म्हणाले, जत तालुक्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. त्यामुळे माडग्याळ ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सुविधा व आवश्यक साधनसामग्री १० केव्ही जनरेटर पल्स ऑक्सिमीटर, थर्मल गन व मास्क व सँनिटायझर, पी.पी.ई, किट फेसशिल्डसह जनरेटर व शववाहिका उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले.
कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता याबाबत कुठेही कमी पडणार नाही. कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जनतेने हा आजार नष्ट होईपर्यंत शासनाने दिलेल्या नियमावलीचे पालन करण्याचे आवाहन आमदार सावंत यांनी केले.
चाैकट
सर्वांनी सहकार्य करा
सध्या माडग्याळ येथे ४० ऑक्सिजन बेडचे रुग्णालय सुरू केले आहे. उमदी येथेही लवकरच ४० बेडचे रुग्णालय सुरू करणार आहे. या गंभीर काळात सामाजिक संस्था सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी मतभेद बाजूला ठेवून या कठीण काळात लोकांना मदतीचा हात द्यावा ही लढाई सामूहिक आहे. लेाकांचे प्राण वाचले पाहिजेत यासाठी सर्वांनी काम करावे असे आवाहन आमदार सावंत यांनी केले.