पलूस तालुक्यातील सूर्यगाव येथे मगरीचे दर्शन, कृष्णा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 04:48 PM2018-07-20T16:48:27+5:302018-07-20T16:52:43+5:30
सूर्यगाव (ता. पलूस) येथील योगेश सूर्यवंशी यांच्या शेतात मगरीचे वारंवार एकाच ठिकाणी दर्शन होत आहे. याठिकाणी तिची अंडी असण्याची शक्यता असण्याची शक्यता गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
ठळक मुद्देपलूस तालुक्यातील सूर्यगाव येथे मगरीचे दर्शनकृष्णा नदी पात्रात मगरींचा वावर मोठ्या प्रमाणात
वाळवा : सूर्यगाव (ता. पलूस) येथील योगेश सूर्यवंशी यांच्या शेतात मगरीचे वारंवार एकाच ठिकाणी दर्शन होत आहे. याठिकाणी तिची अंडी असण्याची शक्यता असण्याची शक्यता गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
कृष्णा नदी पात्रात नागठाणे बंधाऱ्यापासून ते सांगली बंधाऱ्यांपर्यंत मगरींचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. नागठाणे बंधाऱ्याजवळील शिरगाव हद्दीतील वस्तीवर यापूर्वी मगर पकडली आहे. तर बंधाऱ्यांच्या खालील बाजूला मगरीने एका व्यक्तीवर हल्ला करून ओढून नेले होते.
भिलवडी, औदुंबर, अंकलखोप, चोपडेवाडी, तुंग, कृष्णानगर, ब्रह्मनाळ, कसबे व मौजे डिग्रज व सांगली याठिकाणीही मगरीने अनेकांवर हल्ला केला आहे.