महाडिक युवाशक्ती मदतीस सदैव तयार : राहुल महाडिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:22 AM2021-04-26T04:22:57+5:302021-04-26T04:22:57+5:30
ओळ : इस्लामपूर येथे ज्येष्ठ नागरिक, अपंग, निराधार व्यक्तींसाठी मोफत रिक्षा सेवेचा प्रारंभ राहुल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. ...
ओळ : इस्लामपूर येथे ज्येष्ठ नागरिक, अपंग, निराधार व्यक्तींसाठी मोफत रिक्षा सेवेचा प्रारंभ राहुल महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी कपिल ओसवाल, अध्यक्ष सतीश महाडिक, व्यवस्थापक रघुनाथ बागडी, चेतन चव्हाण, धीरज कबुरे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कोरोनाच्या महामारीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात टाळेबंदी लागली आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक, अपंग, निराधार लोकांना लस घ्यायला जाण्यासाठी अडचणी येतात. या अडचणी सोडवण्यासाठी महाडिक युवाशक्तीचे कार्यकर्ते सदैव मदत करण्यास तयार असल्याचे महाराष्ट्र भाजप युवामोर्चाचे उपाध्यक्ष राहुल महाडिक यांनी सांगितले.
ते महादेवनगर येथील ज्येष्ठ नागरिक, अपंग व निराधार व्यक्तींसाठी महाडिक युवाशक्ती अध्यक्ष सुजीत थोरात व महादेवनगर मित्र परिवाराच्या वतीने ज्यांना कोविड-१९ ची लस घ्यायची आहे, त्यांच्यासाठी मोफत रिक्षा सेवेच्या प्रारंभ प्रसंगी बोलत होते. या वेळी माजी नगरसेवक कपिल ओसवाल, महाडिक मल्टिस्टेटचे अध्यक्ष सतीश महाडिक, व्यवस्थापक रघुनाथ बागडी, चेतन चव्हाण, धीरज कबुरे उपस्थित होते. या मोफत सेवेचा लाभ ज्येष्ठ नागरिक, अपंग व निराधार व्यक्तींनी घ्यावा, असे आवाहन सुजीत थोरात यांनी केले आहे.