आरग मतदारसंघात यंदा महिलाराज

By admin | Published: January 10, 2017 11:07 PM2017-01-10T23:07:34+5:302017-01-10T23:07:34+5:30

तिरंगी लढतीचे संकेत : काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप सज्ज, महिला आरक्षणामुळे स्थानिक नेत्यांचा अपेक्षाभंग

Mahagaraj this year in the rag constituency | आरग मतदारसंघात यंदा महिलाराज

आरग मतदारसंघात यंदा महिलाराज

Next

संजय माने, मोहन मगदूम ल्ल टाकळी, लिंगनूर
मिरज तालुक्यातील आरग जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण महिलांसाठी राखीव असल्याने महिलाराज येणार आहे. आरक्षणामुळे अपेक्षाभंग झालेल्या स्थानिक नेत्यांनी समर्थक उमेदवार देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी व भाजप अशी तिरंगी लढत होण्याचे संकेत आहेत.
आरग जिल्हा परिषद गटात आरग, लक्ष्मीवाडी, शिंदेवाडी, खटाव, लिंगनूर, संतोषवाडी, जानराववाडी या गावांचा समावेश आहे. हा गट इतर मागास महिलेसाठी राखीव असल्याने लिंगनूरचे काँग्रेसचे समन्वयक आर. आर. पाटील यांच्या पत्नी वीणाताई पाटील, ग्रामपंचायत सदस्या जनाबाई पाटील व आरगमधून सोसायटीचे अध्यक्ष मौलाअली मुजावर यांच्या पत्नी अ‍ॅड. रूबीनाबी मुजावर, माजी सभापती कविता माळी, रेखा अशोकराव सायमोते, संगीता सर्जेराव नाईक (खटाव) इच्छुक आहेत.
पंचायत समितीच्या दोन्ही गणात सर्वसाधारण महिलेचे आरक्षण आहे. आरग गणातून लक्ष्मीवाडीचे सरपंच वसंत खोत यांच्या पत्नी शोभा खोत, आरगचे माजी सरपंच एस. आर. पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील, सोनाली आबासाहेब पाटील, तर खटाव गणातून ग्रामपंचायत सदस्या कविता प्रकाश मालगावे, काँग्रेसचे रावसाहेब बेडगे यांच्या पत्नी व लिंगनूर येथील नलवडे गटातून महिला रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
येथे पक्षीय राजकारणाला महत्त्व असल्याने पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या प्रचारात आघाडी घेण्याच्या तयारीत कार्यकर्ते आहेत. त्यामुळे उमेदवार कोण, कोण असणार, याकडे लक्ष आहे.
मागील निवडणुकीत स्थानिक नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे आरग गटात प्रकाश देसाई बिनविरोध निवडून आले होते. संपूर्ण जिल्ह्यात याची चर्चा झाली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप स्वतंत्र लढण्याच्या मन:स्थितीत असल्याने चुरशीच्या होणाऱ्या तिरंगी लढतीत कार्यकर्त्यांसह नेत्यांना कसरत करावी लागणार आहे.
आरग येथे आ. सुरेश खाडे यांनी विकासकामे केल्याने स्थानिक नेते भाजपच्या संपर्कात आहेत. त्यामुळे कॉँग्रेस व राष्ट्रवादीला भाजपचे आव्हान असणार आहे. आरक्षणामुळे मतदारांचा कौल व नेतेमंडळींची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
जिल्हा परिषद मतदार संघातील लोकसंख्येने मोठे असलेल्या आरग ग्रामपंचायतीवर सध्या सर्वपक्षीय गटाची सत्ता आहे. मागील ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वपक्षीय नेतृत्व मानणाऱ्या पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांनी सोयीनुसार स्वतंत्र दोन पॅनेल उभी केली होती. त्यात राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांना मानणारे कार्यकर्ते होते. यामध्ये अरुण गतारे, प्रकाश देसाई, आबासाहेब पाटील, अशोक विभूते, स्वाभिमानी शेकतरी संघटनेचे बी. आर. पाटील यांनी आठ जागांवर विजय मिळविला होता, तर विरोधी पॅनेलमधून सागर वडगावे, गोविंद पाटील, डॉ. रमेश आरगे, डॉ. संतोष वाले, एस. आर. पाटील यांच्या नेतृत्वाखाली नऊ उमेदवार निवडून आले होते, मात्र आरक्षणामुळे सरपंचपद विरोधी गटाकडे गेले.
लिंगनूर, खटाव, लक्ष्मीवाडी, शिंदेवाडी येथे भाजप, राष्ट्रवादी व काँग्रेसला मानणारे गट आहेत. आ. जयंत पाटील व माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या भूमिकेवरही या मतदार संघाचे समीकरण अवलंबून आहे. निवडणुक जाहीर झाल्यानंतरच येथील समिकरणे स्पष्ट होणार आहेत. याकडे आता लक्ष लागले आहे.
गतवेळी गट तट बाजूला$$्निगतवेळी आरग जि. प. मतदार संघात गटतट बाजूला ठेवून बिनविरोध निवडणूक पार पाडण्याचा विक्रम स्थानिक नेत्यांनी केला. त्यामुळे प्रकाश देसाई यांच्याकडे नेतृत्व आले. त्यांना खेचण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीने जोरदार प्रयत्न केले होते. त्यात काँग्रेसला यश मिळाले. .

Web Title: Mahagaraj this year in the rag constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.