‘महाजन कन्सर्न्स’चा उपक्रम स्तुत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:38 AM2021-02-26T04:38:20+5:302021-02-26T04:38:20+5:30
फोटो ओळी : शाहुवाडी तालुक्यातील शितूर येथे रथसप्तमीनिमित्ताने महाजन कन्सर्न्स यांनी एल. पी. जी. पंचायत, हळदी-कुंकू व भेटवस्तू कार्यक्रम ...
फोटो ओळी : शाहुवाडी तालुक्यातील शितूर येथे रथसप्तमीनिमित्ताने महाजन कन्सर्न्स यांनी एल. पी. जी. पंचायत, हळदी-कुंकू व भेटवस्तू कार्यक्रम घेतला. यावेळी सुखदा महाजन, शालवी शहा आदी उपस्थित होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शितूरसारख्या दुर्गम भागात महिलांना घरगुती गॅस सुरक्षितपणे कसा वापरावयाचा, याची माहिती देऊन महिला उपयोगी वस्तू देण्याचा महाजन कन्सर्न्सचा उपक्रम स्तुत्य आहे, असे गौरवोद्गार बजरंग पाटील यांनी काढले. शिराळा येथील महाजन कन्सर्न्समार्फत रथसप्तमी व एल. पी. जी. पंचायतनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
हिंदुस्थान पेट्रोलियम काॅर्पोरेशन लि. यांनी गॅस ग्राहकांना गॅसची माहिती व्हावी यासाठी एल. पी. जी. पंचायत घेण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने शिराळा येथील गॅस वितरक महाजन कन्सर्न्स यांनी रथसप्तमीचे औचित्य साधून एल. पी. जी. पंचायत, हळदी-कुंकू व भेटवस्तू वाटप असा संयुक्त कार्यक्रम घेतला. हा कार्यक्रम कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील शितूर येथे आयोजित केला होता. यावेळी रामचंद्र पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. महाजन कन्सर्न्सच्या प्रमुख सुखदा महाजन यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बजरंग पाटील, स्वानंद महाजन, पांडुरंग जाधव, शामराव घेवदे यांनी परिश्रम घेतले.