प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी महालक्ष्मी व महाराष्ट्र एक्स्प्रेस जूनअखेर रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:29 AM2021-05-06T04:29:34+5:302021-05-06T04:29:34+5:30
राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू आहे. जिल्हाअंतर्गत प्रवासासाठी ई-पासची सक्ती करण्यांत आली ...
राज्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू आहे. जिल्हाअंतर्गत प्रवासासाठी ई-पासची सक्ती करण्यांत आली आहे. मात्र रेल्वे प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नसतानाही रेल्वे गाड्या मोकळ्या धावत आहेत. मुंबई, पुणे, नागपूर या मोठ्या शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नेहमी फुल्ल असलेल्या एक्स्प्रेस गाड्यांना प्रवाशांचा अल्प प्रतिसाद आहे. गेले महिनाभर एक्स्प्रेस रेल्वे गाड्या रिकाम्या धावत असल्याने रेल्वेचे नुकसान होत आहे.
कोल्हापूर, मिरज, सांगली परिसरातून मुंबई, पुणे, नागपूर येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी झाल्याने कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेस यापूर्वीच रद्द करण्यात आली आहे. कोल्हापूर-नागपूर महाराष्ट्र एक्स्प्रेसही आता १० मे पासून रद्द करण्यात आली आहे. प्रवासी नसल्याने राज्यातील ४४ एक्स्प्रेस रेल्वेने जूनअखेरपर्यंत रद्द केल्या आहेत.