सांगली कारागृहाला महापुराचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:24 AM2021-07-26T04:24:43+5:302021-07-26T04:24:43+5:30
सांगली : शहरातील पाणीपातळी वाढत रविवारी निम्मे शहर पुराच्या पाण्याने वेढले असताना, महापुराचा जिल्हा कारागृहासही फटका बसला. कारागृह उंचीवर ...
सांगली : शहरातील पाणीपातळी वाढत रविवारी निम्मे शहर पुराच्या पाण्याने वेढले असताना, महापुराचा जिल्हा कारागृहासही फटका बसला. कारागृह उंचीवर असल्याने कैद्यांना त्यामुळे अडचण नसली तरी बाहेर पाणी जमा झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कारागृह प्रशासनाने २४ महिला कैद्यांना शेजारीच असलेल्या शाळेत हलविले. पाणीपातळी वाढण्याची शक्यता नसल्याने इतर कैद्यांना कारागृहातच ठेवण्यात आले आहे.
राजवाडा परिसरात जिल्हा कारागृह असून २०१९ मध्येही या भागाला महापुराचा फटका बसला होता. रविवारीही पाणीपातळी वाढत असताना या परिसरात पाणी वाढले. कारागृह उंचीवर असल्याने आत पाणी वाढण्याची शक्यता नाही. तरीही कारागृह प्रशासनाने महिला कैद्यांची शेजारीच असलेल्या एका शाळेत व्यवस्था केली. जिल्हा कारागृहात सध्या ४०८ कैदी आहेत. रविवारी दुपारनंतर पाणीपातळी स्थिर झाल्याने कारागृहात पाणी शिरण्याची शक्यता नसल्याने इतर कैद्यांना तिथेच ठेवण्यात आले असल्याची माहिती कारागृह अधिकारी सुशील कुंभार यांनी दिली.