सांगली जिल्ह्यात भाजप, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे सर्वाधिक जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 06:40 PM2024-10-29T18:40:06+5:302024-10-29T18:40:50+5:30

सांगली : जिल्ह्यातील महाविकास आघाडी व महायुतीमधील जागावाटप व उमेदवार निश्चित झाले आहेत. महायुतीत सर्वाधिक पाच जागा भाजपच्या वाट्याला ...

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 BJP, NCP Sharad Chandra Pawar party has maximum number of seats In Sangli district | सांगली जिल्ह्यात भाजप, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे सर्वाधिक जागा

सांगली जिल्ह्यात भाजप, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे सर्वाधिक जागा

सांगली : जिल्ह्यातील महाविकास आघाडी व महायुतीमधील जागावाटप व उमेदवार निश्चित झाले आहेत. महायुतीत सर्वाधिक पाच जागा भाजपच्या वाट्याला आल्या असून महाविकास आघाडीत सर्वाधिक चार जागा राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वाट्याला आल्या आहेत. काँग्रेसला तीन, राष्ट्रवादी अजित पवार गटाला दोन व शिंदेसेना, उद्धवसेनेला जिल्ह्यातील प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत युतीत दोन व आघाडीत दोन असे चार प्रमुख पक्ष हाेते. यंदा महायुती व महाविकास आघाडीत प्रत्येकी तीन प्रमुख पक्ष आहेत. त्यामुळे जागावाटपात कोणाला किती जागा मिळणार, याची उत्सुकता राजकीय पटलावर दिसत होती. जागावाटपांची संपूर्ण प्रक्रिया सोमवारी पार पडली. महायुतीत भाजप तर महाविकास आघाडीत राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष जागावाटपात मोठा भाऊ ठरला आहे.

मित्रपक्षांमध्ये धुसफूस

जागावाटपावरून मित्रपक्षांमध्ये सध्या धुसफूस सुरू आहे. मागील निवडणुकीत ज्या जागा शिवसेनेकडे होत्या; पण त्याठिकाणी विजय मिळाला नाही, अशा जागा भाजपने घेतल्याने शिंदेसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते नाराज आहेत. दुसरीकडे काँग्रेसने दावेदारी केलेल्या मिरजेच्या जागी उद्धवसेनेला उमेदवारी दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजी दिसत आहे.

कोणाच्या वाट्याला कोणत्या जागा

मतदारसंघ - महायुती - महाविकास आघाडी

  • सांगली  - भाजप - काँग्रेस
  • मिरज - भाजप - उद्धवसेना
  • शिराळा  - भाजप - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष
  • इस्लामपूर - भाजप - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष
  • पलूस कडेगाव - भाजप - काँग्रेस
  • तासगाव-क. म. - राष्ट्रवादी - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार)पक्ष
  • जत  - भाजप  - काँग्रेस
  • खानापूर   - शिंदेसेना - राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्ष


२०१९ मधील जागावाटप

  • युती : भाजप ४, शिवसेना ४
  • आघाडी : काँग्रेस ३, राष्ट्रवादी ३, स्वा. शे. पक्ष १

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 BJP, NCP Sharad Chandra Pawar party has maximum number of seats In Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.