Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माजी खासदारांचा माज जनता उतरवणार', रोहित पाटलांचा अर्ज दाखल करण्यापूर्वी विशाल पाटीलांनी संजयकाकांना डिवचलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 01:32 PM2024-10-24T13:32:10+5:302024-10-24T13:42:29+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून आज रोहित पाटील अर्ज दाखल केला.

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 mp vishal patil criticized on sanjaykaka patil | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माजी खासदारांचा माज जनता उतरवणार', रोहित पाटलांचा अर्ज दाखल करण्यापूर्वी विशाल पाटीलांनी संजयकाकांना डिवचलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माजी खासदारांचा माज जनता उतरवणार', रोहित पाटलांचा अर्ज दाखल करण्यापूर्वी विशाल पाटीलांनी संजयकाकांना डिवचलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून राज्यात नेत्यांनी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अजूनही जागावाटपासाठी बैठका सुरू आहेत. महाविकास आघाडीने तासगाव -कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या रोहित पाटील यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, आज रोहित पाटील यांनी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार विशाल पाटील, आमदार रोहित पवार उपस्थित होते.यावेळी खासदार विशाल पाटील यांनी माजी खासदार संजयकाका पाटील यांना डिवचले. 

आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!

तासगावात विशाल पाटील यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी माजी खासदार संजयकाका पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली. पाटील म्हणाले, पहिल्यापासून आरआर आबांचं कुटुंब वसंतदादा पाटील यांच्या घराण्यासोबत राहिले. आज रोहित पाटलांचा अर्ज दाखल करत आहेत. ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. रोहित यांनी चांगले काम केले आहे. मी त्यांच्यापाठिशी ठामपणे उभं राहणार आहे. संजयकाका या मतदारसंघात स्थानिक उमेदवार होते पण याच मतदारसंघात ते १० हजार मतांनी मागे राहिले आहेत, असा टोला विशाल पाटील यांनी संजयकाकांना लगावला.

"रोहित पाटलांचा आम्ही जोरदार प्रचार करणार आहे, त्यामुळे आता पुन्हा एकदा माजी खासदारांचा दारुण पराभव होणार आहे. माजी खासदारांच्यात दंगा करण्याचा माज जनता उतरवणार आहे, अशी टीकाही खासदार विशाल पाटील यांनी माजी कासदार संजयकाका पाटील यांच्यावर केली.

संजयकाका विरुद्ध रोहित पाटील ‘कांटे की टक्कर’ होणार

 तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीत यावेळी मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे. भाजपचे नेते माजी खासदार संजयकाका पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी घड्याळ हातात घेतले आहे. बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. याचवेळी माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनीही संजय पाटील यांना साथ देण्याची भूमिका जाहीर केली. जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात हा निर्णय धक्कादायक आणि अनपेक्षित मानला जात आहे.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 mp vishal patil criticized on sanjaykaka patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.