राज्यातील महायुतीचे सरकार उखडून टाकणार : जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 04:49 PM2024-10-25T16:49:52+5:302024-10-25T16:51:24+5:30

'विरोधकांवर फार बोलणार नाही'

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 The mahayuti government will be overthrown in the state says Jayant Patil | राज्यातील महायुतीचे सरकार उखडून टाकणार : जयंत पाटील

राज्यातील महायुतीचे सरकार उखडून टाकणार : जयंत पाटील

इस्लामपूर : राज्यातील महायुतीचे सरकार उखडून टाकत महाविकास आघाडीचे सरकार आणून नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. त्यासाठी मविआच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी केले.

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून सलग आठव्यांदा जयंत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी गांधी चौकात झालेल्या सभेत ते बोलत होते. माजी मंत्री शिवाजीराव नाईक, प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, आमदार मानसिंगराव नाईक, अरूण लाड, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर. पाटील, दिलीपराव पाटील, माणिकराव पाटील, विट्याचे वैभव पाटील, युवा नेते प्रतीक पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

विरोधकांवर फार बोलणार नाही

जयंत पाटील म्हणाले, तुम्हा कार्यकर्त्यांच्या ताकदीवर मी संपूर्ण राज्यात फिरतोय. तुम्ही गाव आणि बूथ सांभाळून तुतारी चिन्ह प्रत्येकापर्यंत पोहोचवा. या निवडणुकीत विरोधकांकडून सर्व प्रकार होतील. राज्य आणि देशातील नेते येऊन आरोप करतील. अफवा पसरवल्या जातील. मतांसाठी वाटेल ती किंमत मोजतील. त्यामुळे तुम्ही विचलित होऊ नका. विरोधकांवर मी फार बोलणार नाही.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 The mahayuti government will be overthrown in the state says Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.