तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात असणार दोन ईव्हीएम यंत्रे, सतरा उमेदवार निवडणूक रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 06:15 PM2024-11-09T18:15:37+5:302024-11-09T18:16:06+5:30

सांगली : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात १७ उमेदवार असल्यामुळे त्यांना प्रत्येकी दोन ईव्हीएम लागणार आहेत. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघासाठी बॅलेट युनिट ...

Maharashtra assembly vidhan sabha election 2024 There will be two EVM machines in Tasgaon Kavathemahankal constituency | तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात असणार दोन ईव्हीएम यंत्रे, सतरा उमेदवार निवडणूक रिंगणात

तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात असणार दोन ईव्हीएम यंत्रे, सतरा उमेदवार निवडणूक रिंगणात

सांगली : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात १७ उमेदवार असल्यामुळे त्यांना प्रत्येकी दोन ईव्हीएम लागणार आहेत. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघासाठी बॅलेट युनिट यंत्रांची संगणकीकृत प्रथम पूरक सरमिसळ जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली व राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडली.

उमेदवारी अर्ज माघारीनंतर तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात १७ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. एका बॅलेट युनिटवर नोटासह १६ उमेदवारांची नावे समाविष्ट होत असल्यामुळे या मतदारसंघात अधिकच्या बॅलेट युनिटसाठी प्रथम पूरक संगणकीकृत केली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी नीता शिंदे, उपजिल्हाधिकारी वसुंधरा बारवे, उपजिल्हाधिकारी सविता लष्करे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी यासीन पटेल आदी अधिकारी उपस्थित होते.

सरमिसळ प्रक्रियेनंतर मालगाव (ता. मिरज) येथील सेंट्रल वेअर हाऊस येथे राजकीय पक्ष प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत शासकीय गोदाम उघडण्यात आले. अधिकचे लागणारे बॅलेट युनिट तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात पाठविण्यात येत असून यांची दुसरी सरमिसळ निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर होणार आहे.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी ईव्हीएम सरमिसळ, पोस्टल बॅलेट, होम वोटिंग, सर्व्हिस वोटर आदींबाबत सविस्तर माहिती दिली. वोटर स्लीप सर्व मतदारांना पोहोचविण्याचे निर्देश देण्यात आले असून जर कोणास वोटर स्लीप मिळाली नसेल तर बूथ पातळीवर प्रतिनिधींनी संबंधित बीएलओशी संपर्क साधून याबाबत माहिती घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

Web Title: Maharashtra assembly vidhan sabha election 2024 There will be two EVM machines in Tasgaon Kavathemahankal constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.