Maharashtra Politics : 'गोपीचंद पडळकरांना मंत्री करा, मला राज्यपाल तरी करा'; सदाभाऊ खोतांची नवी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 16:05 IST2025-04-02T16:02:29+5:302025-04-02T16:05:56+5:30

Maharashtra Politics : आमदार सदाभाऊ खोत यांच्या मागणीने कार्यक्रमात एकच हशा पिकला.

Maharashtra Politics Make Gopichand Padalkar a minister, at least make me the governor Sadabhau Khota's new demand | Maharashtra Politics : 'गोपीचंद पडळकरांना मंत्री करा, मला राज्यपाल तरी करा'; सदाभाऊ खोतांची नवी मागणी

Maharashtra Politics : 'गोपीचंद पडळकरांना मंत्री करा, मला राज्यपाल तरी करा'; सदाभाऊ खोतांची नवी मागणी

Maharashtra Politics ( Marathi News ) : 'पृथ्वीराज देशमुख हे आमदार होतील खासदार होतील. गोपीचंद पडळकर हे मंत्री होतील पण मला कुठं तरी राज्यपाल तरी करा. नाही तर आमचं बॅड वाल्यासारखं व्हायचं', असं विधान आमदार सदाभाऊ खोत यांनी केले. या विधानानंतर कार्यक्रमात एकच हशा पिकला. काल सांगली जिल्ह्यातील विटा येथे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या सत्कार सभारंभाचे आयोजन केले होते. यावेळी आमदार सदाभाऊ खोत उपस्थित होते. यावेळी खोत यांनी पडळकर यांचे कौतुक केले, यावेळी त्यांनी मंत्रिपदावरुन टोला लगावला.

Maharashtra Politics : "जयंत पाटलांचं अजून तळ्यात मळ्यात, भाजपाशिवाय सांगलीला पर्याय नाही"; गोपीचंद पडळकरांनी पुन्हा डिवचले

सदाभाऊ खोत म्हणाले, गोपीचंद पडळकर यांनी दुष्काळ भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळालं पाहिजे याच्यासाठी संघर्ष केला. गोपीचंद पडळकर हा मंगळसूत्र चोरणारा नाही तर मंगळसूत्राचं रक्षण करणारा आहे. कारण योद्धा रणांगणात हरत नसेल तर त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. देवाभाऊ एकदा पडळकर यांना मंत्री केल्याशिवाय थांबणार नाही, तोपर्यंत कोणीही देव पाण्यात ठेवले तरी काहीही होणार नाही.  

यावेळी बोलताना सदाभाऊ खोत यांनी मला राज्यपाल तरी करा असं म्हणताच कार्यक्रमात हशा पिकला. पृथ्वीराज देशमुख हे आमदार होतील खासदार होतील. गोपीचंद पडळकर हे मंत्री होतील पण मला कुठं तरी राज्यपाल तरी करा. नाही तर आमचं बॅड वाल्यासारखं व्हायचं. बॅडवाल्याचं कसं असतं चांगलं गाणं वाजवायला लागलं की शेजारी असणारे सर्व म्हणतात की पुन्हा एकदा होऊन जाऊ दे. तशी आमची अवस्था झाली आहे, सदाभाऊ खोत यांच्या विधानानंतर एकच हशा पिकला.

गोपीचंद पडळकरांची टीका

 गोपीचंद पडळकर यांनी आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीवरही भाष्य केले. गोपीचंद पडळकर म्हणाले, जयंत पाटील अजून तळ्यात -मळ्यात करत आहेत.त्यांचे कुठे जायचे ते अजून ठरत नाही. पण आपल्या विरोधात ताकदीने लढायचे हा जयंत पाटील यांचा अजेंडा पक्का आहे, असा टोलाही गोपीचंद पडळकर यांनी लगावला. जयंत पाटील यांना आता गट, पक्ष विचारत नाही. भाजपाशिवाय देशाला आणि सांगलीलाही पर्याय नाही. यामुळे आता होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत सांगली जिल्हा परिषदेवर भाजपाचा झेंडा रोवू, असंही आमदार पडळकर म्हणाले. 

Web Title: Maharashtra Politics Make Gopichand Padalkar a minister, at least make me the governor Sadabhau Khota's new demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.