अमृतसर ते कोल्हापूरदरम्यान महाराष्ट्र संपर्क क्रांती एक्स्प्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:19 AM2021-07-20T04:19:13+5:302021-07-20T04:19:13+5:30

सांगली : अमृतसर ते कोल्हापूर या नव्या महाराष्ट्र संपर्क क्रांती एक्स्प्रेसचा प्रस्ताव उत्तर रेल्वेने रेल्वे मंडळाकडे पाठवला आहे. मंडळामध्ये ...

Maharashtra Sampark Kranti Express between Amritsar to Kolhapur | अमृतसर ते कोल्हापूरदरम्यान महाराष्ट्र संपर्क क्रांती एक्स्प्रेस

अमृतसर ते कोल्हापूरदरम्यान महाराष्ट्र संपर्क क्रांती एक्स्प्रेस

Next

सांगली : अमृतसर ते कोल्हापूर या नव्या महाराष्ट्र संपर्क क्रांती एक्स्प्रेसचा प्रस्ताव उत्तर रेल्वेने रेल्वे मंडळाकडे पाठवला आहे. मंडळामध्ये त्याविषयी अद्याप निर्णय झालेला नाही, पण ती मंजूर झाल्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचा पंजाबसोबत थेट संपर्क होणार आहे.

प्रस्तावानुसार अमृतसरमधून प्रत्येक मंगळवारी व शनिवारी निघेल, तर कोल्हापुरातून सोमवारी व गुरुवारी निघेल. अमृतसरमधून सकाळी १०.१० वाजता निघालेली एक्स्प्रेस जालंधर, लुधियाना, अंबाला, नवी दिल्ली, कोटा, वडोदरा, कल्याण, पुणे, सातारा, मिरजमार्गे कोल्हापूरला दुसऱ्या दिवशी रात्री ८.४० वाजता पोहोचेल. कोल्हापुरातून सकाळी ७.०५ वाजता निघून याच मार्गाने दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सव्वापाच वाजता अमृतसरला पोहोचेल.

२२ बोगींच्या एक्स्प्रेसला ४ जनरल. नऊ स्लीपर, एक पेन्ट्री, चार थ्री टायर वातानुकूलित, एक टू टायर वातानुकूलित आणि एक प्रथमवर्ग कम द्वितीय श्रेणी वातानुकूलित डबा असेल. अमृतसर ते पुणेदरम्यान विजेच्या इंजिनावर तर पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत डिझेल इंजिनावर धावेल.

अमृतसरमध्ये परतल्यानंतर ही गाडी भागलपूरसाठी आठवड्यातून दोनवेळा धावणार आहे.

चौकट

पंजबसाठी पहिलीच एक्स्प्रेस

पश्चिम महाराष्ट्रातून थेट पंजाबसाठी ही पहिलीच एक्स्प्रेस असेल. यापूर्वी यशवंतपूर-चंदीगड एक्स्प्रेस मिरज, सांगलीमार्गे पंजाबसाठी धावत होती, पण कोल्हापूरसाठी तिचा उपयोग नव्हता. शिवाय ती कर्नाटकातून येत असल्याने सांगली, मिरजेसाठीचा कोटाही अत्यंत मर्यादित होता. कर्नाटक संपर्क क्रांती एक्स्प्रेस या नावाने ती धावायची. कोविडकाळात ती बंद आहे. नवी प्रस्तावित कोल्हापूर-अमृतसर महाराष्ट्र संपर्क क्रांती एक्स्प्रेस या भागासाठी हक्काची ठरेल. उत्तर रेल्वेने प्रस्ताव ठेवल्याने ती मंजूर होण्याची शक्यता जास्त आहे. सांगली, कोल्हापुरातूनही राजकीय ताकद मिळाल्यास तिला हिरवा कंदील दाखविण्याशिवाय रेल्वे मंडळाला पर्याय नसेल.

Web Title: Maharashtra Sampark Kranti Express between Amritsar to Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.