Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 06:21 PM2024-10-28T18:21:54+5:302024-10-28T18:26:47+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली जिल्ह्यातील शिराळा विधानसभेत महायुतीला मोठा धक्का बसला आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 A shock to Sanglit Mahayutti BJP leader Samrat Mahadik filed an independent application | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांच्या रणधुमाळी सुरू झाली असून अर्ज दाखल करण्यासाठी काहीच तास उरले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात उमेदवार अर्ज दाखल करत आहेत. दरम्यान, शिराळा विधानसभा मतदारसंघात महायुतीला मोठा झटका बसला आहे. भाजपाचे नाराज नेते सम्राट महाडिक यांनी आज अपक्ष अर्ज दाखल केला आहे. यामुळे आता महायुतीच्या उमेदवाराच्या अडचणी वाढल्या आहेत. सम्राट महाडिक यांनी आज उमेदवारी अर्ज माघार घेणार नसल्याचेही जाहीर केले आहे. 

आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!

शिराळा विधानसभेमध्ये भाजपाचे नेते सम्राट महाडिक यांनी आझ अपक्ष अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी सम्राट महाडिक म्हणाले, दोन दिवसापूर्वी भाजपाच्या उमेदवारीची घोषणा झाली. काल आमच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली. ज्या पद्धतीने भाजपाने आपल्याला शब्द दिला होता, तो पाळला नाही. म्हणून आता थांबायचं नाही लढायचं हा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला. यामुळे आज आम्ही अर्ज दाखल केला. कालच आम्ही थांबणार नाही असं सांगितलं आहे. मी कालच अर्ज भरला तर माघार घेणार नाही असं सांगितलं होतं, असं स्पष्ट सम्राट महाडिक यांनी सांगितलं.

"आमचं राजकारण हे कार्यकर्त्यांच्या जोरावर चालतं. आम्ही त्यांची इच्छा जुगारुन काम करत नाही. मनधरणी करायची असती तर मागच झाली असती. आम्ही गेल्या पाच वर्षापासून काम केलं आहे. आम्हा दोघांना बसवून उमेदवारी जाहीर करायला पाहिजे होती, दोन दिवसापूर्वी मलाच उमेदवारी देणार असं सांगितलं होतं. आता वरुन काही दबाव येईल असं वाटत नाही, आता अर्ज माघारीचा विषय राहणार नाही, असंही सम्राट महाडिक म्हणाले.

भाजपाने सत्यजीत देशमुखांना दिली उमेदवारी

भाजपाने शिराळा विधानसभा मतदारसंघासाठी सत्यजीत देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात सम्राट महाडिक इच्छुक होते, आता महाडिक यांनी बंडखोरी केली आहे. यामुळे भाजपा उमेदवाराच्या अडचणी वाढल्या आहेत. तर दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आमदार मानसिंगराव नाईक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, आता भाजपामधील उमेदवाराने केलेल्या बंडखोरीमुळे ही लढत तिरंगी होणार आहे. 

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Election 2024 A shock to Sanglit Mahayutti BJP leader Samrat Mahadik filed an independent application

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.