Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2024 01:44 PM2024-11-08T13:44:53+5:302024-11-08T13:48:34+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 jayant patil criticized on bjp leader amit shah | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रचारसभा सुरू असून आज केंद्रीय मंत्री अमित शाह सांगली येथे प्रचारसभा घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमित शाह यांच्यावर निशाणा साधला. काल शिराळा विधानसभा मतदारसंघात जयंत पाटील यांनी प्रचारसभा घेतल्या. यावेळी बोलताना पाटील म्हणाले,'देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला येत आहेत',असा निशाणा जयंत पाटील यांनी शाह यांच्यावर लगावला. 

महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

प्रचारसभेत बोलाना जयंत पाटील म्हणाले, या देशात गरीब माणसाकडून कर जास्त प्रमाणात गोळा केला जातो. मोठ्या माणसांन हलिकॉप्टर खरेदी करायला गेले तर त्याला ५ टक्के लावला जातो आणि सामान्य लोक दोन चाकी गाडी घ्यायला गेले तर त्यावर २४ टक्के टॅक्स लावला जातो.या देशात श्रीमंताला न्याय आणि गरीबाला खेटे घालयाला लावणारे हे सरकार आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. 

"आपल्याकडे मोठ्या कंपन्यांची गुंतवणूक होत नाही. आयआयटी मुंबईत शिकलेल्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या लागत नसतील तर आपल्याकडे शिकलेल्या विद्यार्थ्यांना नोकऱ्या कशा लागतील, असा सवालही जयंत पाटील यांनी केला. महाराष्ट्रात आम्ही काहाही करु शकतो अशी माणसीकता यांची आहे. एका रस्त्याला सरकार एका किलोमीटरसाठी २७३ कोटी रुपये मोजत आहे. विरार ते अलिबाग रस्त्याला मागणी कोणाचीही नाही, पुण्याच्या रिंगरोडमध्ये रस्त्याला मोठा खर्च केला, असंही पाटील म्हणाले. 

"या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई वाढली आहे. महाराष्ट्राला पुन्हा पुढे घेऊन जायचं असेल तर शिंदे सरकार घालवणे गरजेचे आहे, असंही पाटील म्हणाले.  

शिराळा विधानसभा निवडणुकीत महायुतीकडून सत्यजीत देशमुख आणि महाविकास आघाडीमधून आमदार मानसिंगराव नाईक निवडणूक लढवत आहेत. आज  भाजपाचे नेते अमित शाह सांगली दौऱ्यावर आहे. शाह शिराळा विधानसभेत सभा घेणार आहेत.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Election 2024 jayant patil criticized on bjp leader amit shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.