माकपतर्फे आजपासून महाराष्ट्राचे दीपस्तंभ ऑनलाईन व्याख्यानमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:44 AM2021-05-05T04:44:00+5:302021-05-05T04:44:00+5:30

सांगली : कामगार दिन, महाराष्ट्र दिन आणि कार्ल मार्क्स जयंतीनिमित्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे महाराष्ट्राचे दीपस्तंभ ही ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित ...

Maharashtra's Deepastambh online lecture series from today | माकपतर्फे आजपासून महाराष्ट्राचे दीपस्तंभ ऑनलाईन व्याख्यानमाला

माकपतर्फे आजपासून महाराष्ट्राचे दीपस्तंभ ऑनलाईन व्याख्यानमाला

Next

सांगली : कामगार दिन, महाराष्ट्र दिन आणि कार्ल मार्क्स जयंतीनिमित्त मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे महाराष्ट्राचे दीपस्तंभ ही ऑनलाईन व्याख्यानमाला आयोजित केली आहे. ५ ते २५ मेदरम्यान संध्याकाळी साडेसहा वाजता व्याख्याने सुरू होतील.

फेसबुक व युट्यूब वाहिन्यांवरूनदेखील प्रक्षेपित केली जाणार आहे.

व्याख्याने अशी : ५ मे - मराठी संत आणि समाजप्रबोधन (प्रसाद कुलकर्णी), ६ मे - छत्रपती शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण (आनंद मेणसे), ७ मे - महात्मा जोतीराव फुले : क्रांतीचा असूड (उदय नारकर), ८ मे - सावित्रीबाई फुले (डॉ. माया पंडित), ९ मे - न्यायमूर्ती रानडे : सर्वांगीण सुधारक (राजा दीक्षित), १० मे - टिळक आणि आगरकर : परिवर्तनाचे राजकारण आणि राजकारणाचे परिवर्तन (कुमार केतकर). ११ मे - राजर्षी शाहू महाराज (जयसिंगराव पवार), १२ मे - महर्षी वि. रा. शिंदे (सदानंद मोरे). १३ मे - डॉ. बाबासाहेब आंबेडकर (सुहास पळशीकर). १४ मे - जेधे, जवळकर आणि प्रबोधनकार ठाकरे : ब्राह्मणेतरवाद ते समाजवाद (अशोक चौसाळकर). १५ मे - डावे दीपस्तंभ (दत्ता देसाई), १६ मे - बी. टी. रणदिवे व श्री. अ. डांगे (अजित अभ्यंकर),

१७ मे - क्रांतिसिंह नाना पाटील (बाबूराव गुरव), १८ मे - मानवतेचे जागले : गोदावरी- शामराव परुळेकर (अशोक ढवळे). १९ मे - भाऊराव पाटील (किशोर बेडकीहाळ). २० मे - दादासाहेब गायकवाड (सुरेंद्र जोंधळे). २१ मे - अण्णाभाऊ साठे : निळ्या आकाशातील लाल तारा (सुबोध मोरे), २२ मे - हमीद दलवाई आणि मुस्लिम प्रबोधन (रझिया पटेल). २३ मे - आधुनिक महाराष्ट्रातील वैचारिक दीपस्तंभ एक संकल्पना : डॉ, नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे (गोपाळ गुरू). २४ मे - प्रबोधन और समाजवाद : समारोप (सीताराम येचुरी).

Web Title: Maharashtra's Deepastambh online lecture series from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.