कोरोनाग्रस्तांची भूक भागवण्यासाठी माहेश्वरी युवा मंच आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:21 AM2021-06-02T04:21:14+5:302021-06-02T04:21:14+5:30

सांगली : माहेश्वरी युवा मंचाच्या २०० सदस्यांनी कोरोनाकाळात भुकेलेल्यांच्या हाकेला प्रतिसाद दिला आहे. सांगली-मिरजेतील कोरोनाग्रस्तांच्या नातेवाइकांना दोन वेळचे जेवण ...

Maheshwari Yuva Manch in the forefront to satisfy the hunger of coronaries | कोरोनाग्रस्तांची भूक भागवण्यासाठी माहेश्वरी युवा मंच आघाडीवर

कोरोनाग्रस्तांची भूक भागवण्यासाठी माहेश्वरी युवा मंच आघाडीवर

Next

सांगली : माहेश्वरी युवा मंचाच्या २०० सदस्यांनी कोरोनाकाळात भुकेलेल्यांच्या हाकेला प्रतिसाद दिला आहे. सांगली-मिरजेतील कोरोनाग्रस्तांच्या नातेवाइकांना दोन वेळचे जेवण पुरवले जात आहे.

माहेश्वरीने यापूर्वीही सांगलीकरांसाठी रक्तदान, अन्नदान, शैक्षणिक मदत, क्रीडा, चौक सुशोभीकरण असे उपक्रम राबवले आहेत. १७ वर्षांपासून अखंड समाजकार्य सुरू आहे. कोरोनाकाळातही विलगीकरणातील रुग्ण व नातेवाइकांना डबे पुरवले जात आहेत. यासाठी कोविड कार्य दल तयार केले आहे. दररोज ३२५ डबे वितरित केले जात आहेत.

आदित्य मानधना, विजय लड्डा, अमित काबरा, पवन सारडा, अमोल लड्डा, राहुल मर्दा, गौरव मानधना, महेंद्र सारडा, संकेत बजाज, हर्ष मालू, किशन बजाज, कौशिक बजाज, प्रतीक बघारिया, सचिन सारडा, नितीन बंग, अमित मालाणी, महेश बलदवा, श्याम सारडा,

शेखर देशपांडे, मिथिल झंवर, सागर सारडा, अजय सारडा, विजय सारडा, रमण सारडा, सिद्धार्थ बजाज, अभिषेक बजाज, अभिषेक सारडा, रौनक बजाज, राघव जाखोटिया, लक्ष्मीकांत झंवर, लक्ष्मीकांत मालपाणी, पंकज बजाज, मुकुंद मालू, सचिन डागा, मितेश मालू, कपिल मालू, ब्रिजेश काबरा, प्रदीप तोष्णीवाल, अनिल काबरा, श्रीराम मालाणी, लक्ष्मीकांत सारडा, सर्वेश बियाणी, प्रकाश मुंदडा आदींनी उपक्रमात सहभाग घेतला आहे.

Web Title: Maheshwari Yuva Manch in the forefront to satisfy the hunger of coronaries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.