म्हैसाळ -नरवाड रस्ता पँचवर्क काम सुरू, लोकमतचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 03:38 PM2021-06-12T15:38:01+5:302021-06-12T15:39:03+5:30
road safety Pwd Sangli : मिरज तालुक्यातील म्हैसाळ -नरवाड रस्ता खड्डामुळे बनतोय मृत्यूचा सापळा या मथळ्याखाली लोकमतने 30 मे रोजी बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पँचवर्कच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
सुशांत घोरपडे
म्हैसाळ : मिरज तालुक्यातील म्हैसाळ -नरवाड रस्ता खड्डामुळे बनतोय मृत्यूचा सापळा या मथळ्याखाली लोकमतने 30 मे रोजी बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पँचवर्कच्या कामाला सुरुवात करण्यात आली.
मिरज तालुक्यातील म्हैसाळ -नरवाड या रस्ताचे काम अनेक वर्षांपासून झालेले नव्हते. म्हैसाळ पासून पाच ते सहा किलोमीटरचा हा रस्ता आहे.नरवाड,माळेवाडी, लक्ष्मीनगर, गायरानवाडी, बारा कोटरी या छोट्या वाडीवस्तीवर राहणारे लोक या रस्तावरून प्रवास करतात.
या रस्तावर मोठ मोठ्या ठिकाणी खड्डे पडल्याने दररोज लहान-मोठे अपघात होत होते.शिवाय आता पावसाळा सुरू झाल्याने मोठे पाऊस होऊन खड्डात पाणी साचल्याने दुचाकीस्वार पडून जखमी होण्याचे प्रमाण वाढले होते.यामुळे नरवाड व म्हैसाळ मधील नागरीकांनी लोकमतने यावर आवाज उठवावा अशी विनंती केली होती.
त्यानुसार लोकमतने प्रिंट मिडिया व आँनलाईनच्या माध्यमातून बातमी प्रसिद्ध केली होती. अखेर लोकमतच्या पाठपुराव्याला यश आल्याने म्हैसाळ -नरवाड मधील नागरीकांनी लोकमतला धन्यवाद दिले.
म्हैसाळ -नरवाड रस्ताच्या पँचवर्क चे काम सुरू झाले.याबाबत लोकमतने आवाज उठविला होता त्याबद्दल लोकमतचे अभिनंदन. भविष्यात हा रस्ता नवीन व्हावा अशी मागणी पालकमंत्री जयंतरावजी पाटील यांच्याकडे
करणार आहे.
-मनोज शिंदे-म्हैसाळकर
उपाध्यक्ष, सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
पावसाळ्यात या रस्तावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांची गैरसोय होऊ नये म्हणून म्हैसाळ -नरवाड रस्तावर पँचवर्क करण्याचे काम तात्काळ सुरू केले आहे.भविष्यात हा रस्ता नव्याने करण्यासाठी वरीष्ठ पातळीवर पाठपुरावा करू.
-एम.ए.खांडेकर,
सहाय्यक अभियंता,
सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज.