माहुलीत रथयात्रेत मारामारी
By admin | Published: May 21, 2014 01:05 AM2014-05-21T01:05:27+5:302014-05-21T17:35:57+5:30
गुलाल उधळण्याचे कारण : अकराजण जखमी, पाचजणांना अटक
विटा : माहुली (ता. खानापूर) येथील ग्रामदैवत नाथदेवाच्या यात्रेत रथ मिरवणुकीवेळी गुलाल उधळण्याच्या कारणावरून काठ्या व कुºहाडीने मारामारी झाली. त्यात सात महिलांसह ११ जण जखमी झाले. ही घटना काल, सोमवारी रात्री उशिरा घडली. जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी विटा पोलिसांत १३ जणांसह अन्य २० ते २५ अनोळखींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातील पाचजणांना अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी प्रकाश हणमंत बंडगर (वय १९), तेजस किसन सुतार (२२), चेतन चंद्रकांत स्वामी (२७), अवधूत धनाजी देवकर (२०) व राहुल रामचंद्र पवार (२१, सर्व रा. माहुली) या पाचजणांना अटक केली आहे. माहुली येथील ग्रामदैवत नाथदेवाची यात्रा सुरू आहे. सोमवारी दुपारी तीनला रथाची मिरवणूक सुरू असताना रथासमोर गुलाल उधळण्याच्या कारणावरून सौ. शालन भगवान फाळके यांचा नातू रंजन बिपीन फाळके याला संशयित राजू नंदकुमार पाटील व चेतन चंद्रकांत स्वामी यांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर पाटील व स्वामी यांनी रात्री उशिरा पुन्हा जमाव जमवून फाळके वस्तीकडे मोर्चा वळविला. त्यावेळी पाटील, स्वामी या दोघांसह अन्य १३ जणांनी सौ. शालन फाळके, रंजन, दर्शन, अनिता, प्रेरणा बिपीन फाळके, पार्वती विठ्ठल फाळके, संगीता जगदीश फाळके, मंगल उत्तम फाळके, अमोल विठ्ठल फाळके व मंगल अशोक वायदंडे यांना जातीवाचक शिवीगाळ करून काठ्या व कुºहाडीने मारहाण केली. त्यात ११ जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक डॉ. अभिजित पाटील, पोलीस निरीक्षक अनिल पोवार यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले.याप्रकरणी आज, मंगळवारी पहाटे प्रकाश बंडगर, तेजस सुतार, चेतन स्वामी, अवधूत देवकर, राहुल पवार, राजू नंदकुमार पाटील, किरण नाथा पवार, किरण किसन माने, बाळासाहेब नाथा बंडगर, इंद्रजित विश्वनाथ माने, यशवंत महादेव कचरे, बाबू हणमंत बंडगर व अमर माने (सर्व रा. माहुली) या १३ जणांसह अन्य २० ते २५ अनोळखींविरुध्द शालन फाळके यांनी फिर्याद दिली. त्यांच्यावर जातिवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी पाचजणांना अटक केली असून, अन्य संशयित फरार आहेत. (वार्ताहर)