कागनरी गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीस एका महिन्यानंतर उमदी पोलिसांनी पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 10:10 PM2024-01-25T22:10:22+5:302024-01-25T22:10:30+5:30

आरोपी कडून गावठी पिस्तूल जप्त..।

main accused in Kaganari shooting case was caught by Umdi police after a month | कागनरी गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीस एका महिन्यानंतर उमदी पोलिसांनी पकडले

कागनरी गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीस एका महिन्यानंतर उमदी पोलिसांनी पकडले

दरीबडची : कागनरी (ता.जत) येथील गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी प्रकाश तुकाराम लमाणी यास एका महिन्यानंतर उमदी पोलिसांनी बुधवार (दि.२३) रोजी अटक केली.त्यानी गुन्हात वापरलेले देशी बनावटीचे गावठी पिस्टल (अग्निशख) जप्त केले.आरोपीस  ४ दिवस पोलीस कोठडी मिळाली.ही घटना २४ डिसेंबर रोजी घडली होती. याबाबत पापण्णा रतनसिंग लमाणी, (वय ४२,  रा. कागनरी) यांनी फिर्याद दिली होती.

याबाबत उमदी पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की,कागनरी येथील लमाणतांडा येथे जयराम लमाणी यांच्या शेतामध्ये ऊसतोड सुरु होती. शेताजवळ असलेल्या सामाईक रस्त्यावर पापण्णा लमाणी व त्याचा मुलगा अभिजित लमाणी,जयराम लमाणी बोलत उभे होते. त्यावेळी आरोपी प्रकाश तुकाराम लमाणी हा तेथे आला. त्याने पापाणी लमाणी, अभिजित लमाणी यांचेशी मागील भांडणावरून शिवीगाळ करुन फिस्तुल रोखून धमकावण्यास सुरुवात केली.जोरदार वादविवाद झाला.

भांडणा दरम्यान आरोपी प्रकाश लमाणी याने गावठी पिस्टलने अभिजीत यांच्यावर गोळीबार केला.गोळी डाव्या पायाचे मांडीत घुसली.गोळी लागुन गंभीर जखमी झाले.आरोपी प्रकाश लमाणी तेथून पळून गेला.जखमी अभिजित यास विजापूर येथील खाजगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झाले. गुन्हा घडल्यापासुन आरोपी  फरार होता.

आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस अधिक्षक डॉ बसवराज तेली,अपर पोलीस अधिक्षक श्रीमती रितु खोखर,उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल साळुंखे यांचे सुचनांप्रमाणे २ पथके कनार्टक व महाराष्ट्र राज्यात विवीध ठिकाणी आरोपीचा शोध घेत होते.परंतु मिळून आला नव्हता. बातमीदारामार्फत आरोपी प्रकाश हा नातेवाईकांना भेटण्यासाठी कागनरी येथे येणार आहे.अशी माहिती मिळाली पोलीसांना साफळा लावला.भेटायला आल्यावर पकडले.आरोपीकडून गुन्हयात करण्यासाठी वापरण्यात आलेले १५ हजार किंमतीचे गावठी पिस्टल हत्यार जप्त केले.

सहा.पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, आप्पासाहेब हाके, नामदेव काळेल, प्रशांत कोळी, पोना मासाळ, पोकों इंद्रजित घोदे, कुमरे,  सोपान भंडे, आप्पाहेब घोडके, सुदर्शन खोत यांनी ही कार्यवाही केली.अधिक तपास सपोनि संदीप शिंदे करीत आहेत.

Web Title: main accused in Kaganari shooting case was caught by Umdi police after a month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.