सांगली, मिरज सिव्हिलमधील बदली कर्मचाऱ्यांना कायम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:24 AM2021-01-08T05:24:29+5:302021-01-08T05:24:29+5:30
चतुर्थश्रेणी कर्मचारी महासंघातर्फे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना बदली कर्मचाऱ्यांच्या कायम नेमणुकीसाठी निवेदन देण्यात आले. यावेळी संजय व्हनमाने, प्रकाश घोडके, विशाल ...
चतुर्थश्रेणी कर्मचारी महासंघातर्फे राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना बदली कर्मचाऱ्यांच्या कायम नेमणुकीसाठी निवेदन देण्यात आले. यावेळी संजय व्हनमाने, प्रकाश घोडके, विशाल म्हेतर आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली व मिरजेतील शासकीय रुग्णालये व वैद्यकीय महाविद्यालयातील बदली कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची मागणी कर्मचारी महासंघाने केली. तसे निवेदन आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना दिले. चतुर्थश्रेणी कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय व्हनमाने यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, बदली कर्मचाऱ्यांना शासन सेवेत कायम करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. अनेक कर्मचारी वीस-तीस वर्षे काम करूनही त्यांना कायम केलेले नाही. काही कर्मचाऱ्यांनी यासंदर्भात न्यायालयातही धाव घेतली आहे. न्यायालयाने नेमणुकीचे आदेश देऊनही अंमलबजावणीस शासन टाळाटाळ करत आहे. कायम नेमणुकीच्या प्रतीक्षेत अनेकजण निवृत्त झाले, तर काहींचा मृत्यूही झाला, पण न्याय मिळाला नाही.
पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, रुग्णालयांत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या संख्येने रिक्त आहेत, तेथे आमच्या नेमणुका केल्या जाव्यात. नव्या नोकर भरतीवेळी प्राधान्य मिळावे. यासंदर्भात आठवडाभरात उच्चस्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन यड्रावकर यांनी दिले. सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल, अशी ग्वाही दिली. निवेदन देण्यासाठी विशाल म्हेतर, म़ोहन गवळी, प्रकाश घोडके, अन्वर कुरणे उपस्थित होते.