जिल्ह्यात अवकाळी पावसाने द्राक्षबागांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 02:24 PM2021-02-18T14:24:14+5:302021-02-18T14:27:48+5:30

GrapeFarmar Sangli- सांगली जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री झालेल्या पावसाने द्राक्षबागाांचे मोठे नुकसान झाले असून काढणी झाललेल्या ज्वारी, हरभरा या पिकांसह झेंडूचीही हानी झाली आहे. तासगाव तालुक्यात सावळज, डोंगरसोनी येथे वादळी वाऱ्याने चार द्राक्षबागा कोसळून सुमारे ३५ लाखाचे नुकसान झाले.

Major damage to vineyards due to untimely rains in the district | जिल्ह्यात अवकाळी पावसाने द्राक्षबागांचे मोठे नुकसान

जिल्ह्यात अवकाळी पावसाने द्राक्षबागांचे मोठे नुकसान

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात अवकाळी पावसाने द्राक्षबागांचे मोठे नुकसान, अन्य पिकांनाही फटका सावळज, डोंगरसोनीला द्राक्षबागा कोसळल्याने ३५ लाखाची हानी

सांगली : जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री झालेल्या पावसाने द्राक्षबागाांचे मोठे नुकसान झाले असून काढणी झाललेल्या ज्वारी, हरभरा या पिकांसह झेंडूचीही हानी झाली आहे. तासगाव तालुक्यात सावळज, डोंगरसोनी येथे वादळी वाऱ्याने चार द्राक्षबागा कोसळून सुमारे ३५ लाखाचे नुकसान झाले.

सांगली शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात बुधवारी मध्यरात्री विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. सांगली, मिरजेसह कवठेमहांकाळ, तासगाव, इस्लामपूर येथे मध्यम स्वरुपाचा तर जत, आटपाडी, खानापूर, कडेगाव परिसरात तुरळक सरी कोसळल्या. शिराळ्यात केवळ ढगांची दाटी होती.

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने पिकांच्या नुकसानीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. यामध्ये द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले आहे. काहीठिकाणी मणी फुटून तर काही ठिकाणी बागा कोसळून नुकसान झाले आहे. नुकसानीचा आकडा अद्याप समोर आलेला नाही. येत्या दोन दिवसात नुकसानीचे चित्र स्पष्ट होईल.

तासगाव तालुक्यात सावळज येथे नितीन शिवाजी तारळेकर यांची एस.एस. एन जातीची सुमारे पाऊण एकर द्राक्षबाग कोसळून अंदाजे ८ ते ९ लाखाचे, डोंगरसोनी येथील शेतकरी रमेश ज्ञानोबा झांबरे यांची सुपरसोन्नाका जातीची एक एकर द्राक्षबाग कोसळून ८ ते १० लाखाचे, डोंगरसोनीचेच प्रकाश हंबीरराव पवार यांच्या दीड एकर बागेचे कोसळून दहा लाखाचे तर याच गावातील तुळशीराम हंकारे यांची १ एकर बाग कोसळून ७ लाखाचे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यापासूनच शेतकऱ्यांनी बागा वाचविण्यासाठी धडपड सुरु केली होती. यात काहींना काहीप्रमाणात यश मिळाले, मात्र काहींना नुकसानीचा सामना करावा लागला.
 

Web Title: Major damage to vineyards due to untimely rains in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.