चांदोली प्रकल्पग्रस्तांच्या अंतिम याद्या बनवा : राजू शेट्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 12:03 AM2018-03-03T00:03:39+5:302018-03-03T00:03:39+5:30
वारणावती : उखळू (ता. शाहूवाडी) व मणदूर, चांदोलीवाडी (ता. शिराळा) येथील प्रकल्पग्रस्तांच्या संकलन याद्या अंतिम करून देय
वारणावती : उखळू (ता. शाहूवाडी) व मणदूर, चांदोलीवाडी (ता. शिराळा) येथील प्रकल्पग्रस्तांच्या संकलन याद्या अंतिम करून देय जमिनींचा आराखडा तयार करावा. यासंदर्भात कृष्णा खोरे विकास महामंडळाचे नावे असलेल्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित करण्यात याव्यात यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करून पाठपुरावा करू, असे आश्वासन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व खासदार राजू शेट्टी यांनी दिले.
वारणावती (ता. शिराळा) येथील विश्रामगृहात शेतकºयांच्या प्रश्नावर सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पुनर्वसन अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्यातील बैठकीत चर्चा करताना खासदार शेट्टी बोलत होते.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी राजू वडाम, सरपंच राजाराम मुटल, तानाजी वडाम यांनी सांगितले की, चांदोली अभयारण्यातील अधिकारी शेतकºयांवर अन्याय करतात, त्यांचा अतिरेक थांबला पाहिजे व अभयारण्याच्या हद्दी निश्चित करून चराऊ क्षेत्र सोडावे.
त्यासंबंधी एका महिन्यात मोजणी करण्यात येईल असे वन्यजीव विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले. वन्य प्राणी शेतीचे नुकसान करतात. त्यासंबंधी अभयारण्यातील टाकळे, झोळंबी, सोनार्ली, निवळे, लोटीव या गावांच्या हद्दीतील शेकडो हेक्टर क्षेत्रात नैसर्गिक पाण्याचे स्रोत आहेत. तेथे वन्य प्राण्यांच्या चाºयाची उपलब्धता होऊ शकते. त्याबाबत सोय करण्यात येईल, असेही अधिकाºयांनी सांगितले.
उखळू येथे शामाप्रसाद मुखर्जी योजनेंतर्गत गॅस कनेक्शन पुरविण्यात आले आहेत. पण त्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. त्यासंदर्भात कमिटीचे अध्यक्ष व सचिवांवर १५ दिवसात निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे. संपूर्ण रक्कम वसूल करून शेतकºयांना दिली जाईल, असे मुख्य वनसंरक्षक व्ही. क्लेमेट बेन यांनी सांगितले.
यावेळी शाहूवाडीचे प्रांताधिकारी चंद्रशेखर सानप, वाळव्याचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, पुनर्वसन अधिकारी स्वाती कुलकर्णी, शिराळा तहसीलदार दीपक शिंदे, प्रादेशिक वन विभागाचे अधिकारी तानाजी मुळीक, सावळा पाटील, यांच्यासह उखळू, सोनवडे, मिरुखेवाडी, गुढे, करूंगली, काळुंद्रे, खिरवडे येथील शेतकरी उपस्थित होते.
अभयारण्यात इतर ठिकाणचे प्राणी सोडू नका
यावेळी खासदार शेट्टी म्हणाले की, शेतकºयांच्या प्रश्नावर अधिकाºयांनी नरमाईचे धोरण घेऊन अन्याय थांबला पाहिजे. येथून पुढे अन्य ठिकाणांहून बिबट्या, वानरांचे कळप, कुत्री, मगरी असे कोणतेही प्राणी चांदोली अभयारण्यात सोडू नयेत.