हल्लाबोल यात्रा सभा अविस्मरणीय करा : जयंत पाटील -इस्लामपूरमध्ये ५ रोजी सभेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 11:34 PM2018-04-02T23:34:07+5:302018-04-02T23:34:07+5:30

 Make an unforgettable attack meeting: Jayant Patil - organized a meeting on 5th of the Islampur | हल्लाबोल यात्रा सभा अविस्मरणीय करा : जयंत पाटील -इस्लामपूरमध्ये ५ रोजी सभेचे आयोजन

हल्लाबोल यात्रा सभा अविस्मरणीय करा : जयंत पाटील -इस्लामपूरमध्ये ५ रोजी सभेचे आयोजन

Next
ठळक मुद्देमोठ्या वल्गना करणाऱ्या मंडळींना चोख उत्तर देण्याचा निर्धार;

इस्लामपूर : सर्व शक्ती पणाला लावून इस्लामपूर हल्लाबोल यात्रेतील सभा न भूतो न भविष्यती करा, असे आवाहन आमदार जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. अलीकडे जनाधाराशिवाय मोठ्या वल्गना करणाºया मंडळींना या सभेने चोख उत्तर मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ‘हल्लाबोल यात्रा’ ४ व ५ एप्रिलला सांगली जिल्ह्यात येत आहे. ५ रोजी सायंकाळी ६ वाजता इस्लामपूर येथील यल्लम्मा चौकात जाहीर सभा होत आहे. या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ. पाटील म्हणाले, या सरकारचे अपयश लोकांपर्यंत पोहोचविण्याचे हल्लाबोल यात्रा हे प्रभावी माध्यम आहे. पक्षाच्यावतीने यवतमाळपासून सुरू केलेल्या हल्लाबोल यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस हे सत्तेवर येण्यापूर्वी काय बोलत होते आणि सत्तेवर आल्यावर काय बोलत आहेत, हे आम्ही सभेपूर्वी दाखवित आहोत. विदर्भ, मराठवाडा, खानदेशात मोठ्या सभा झाल्या आहेत. आपलीही सभा रेकॉर्डब्रेक झाली पाहिजे.
अण्णासाहेब डांगे म्हणाले, गेल्या साडेतीन वर्षांत लोककल्याणापेक्षा सामान्य माणसांना त्रासदायक निर्णय घेतलेल्या या सरकारला घालवायला पाहिजे. आपल्या तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद कमी झाल्याची दिशाभूल करणाºयांना राष्ट्रवादीची ताकद दाखवून द्या. यापूर्वी इस्लामपूर येथे झालेल्या सर्व सभांचे उच्चांक ही सभा मोडेल. यावेळी त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सभेचा दाखलाही दिला.

तालुकाध्यक्ष विजयराव पाटील म्हणाले, ही सभा यशस्वी करण्यासाठी कामाला लागा. कोणत्या गावातून किती लोक येणार हे कळवा. म्हणजे तशी व्यवस्था करता येईल. पोलीस परेड ग्राऊंड व मार्केट यार्डात पार्किंग सोय केली आहे. युवक तालुकाध्यक्ष संग्रामदादा पाटील, महिला तालुकाध्यक्षा सौ. सुस्मिता जाधव यांनी, या सभेला युवक व महिलाही लक्षणीय संख्येने उपस्थित राहतील, असा विश्वास व्यक्त केला. पं. स. सदस्य पी. टी. पाटील, संचालक माणिक शेळके, धनंजय माने, संजय पाटील, दादासाहेब कदम आदींनी सूचना केल्या.

प्रा. शामराव पाटील, विनायक पाटील, भीमराव पाटील, विष्णुपंत शिंदे, बी. के. पाटील, देवराज पाटील, रणजित पाटील, सभापती आनंदराव पाटील, संभाजी कचरे, बाळासाहेब पवार, शहाजीराव पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे, खंडेराव जाधव, विराज शिंदे, संग्राम फडतरे, आनंदराव नलवडे, अजय चव्हाण, विकास कदम, भास्कर पाटील, सौ. अरुणादेवी पाटील, सौ. रोझा किणीकर, सौ. सुनीता देशमाने, अनिल पाटील, उमेश पवार, विनायक यादव, पृथ्वीराज पाटील यांच्यासह इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.युवक राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष संजय पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील यांनी आभार मानले.

गाफील राहू नका
तुम्ही मनावर घेतले, तर काहीही अशक्य नाही. इस्लामपूर, आष्टा येथे प्रभागवार बैठका घेऊन जोरदार तयारी सुरू आहे. आपणही गावा-गावातून जास्तीत जास्त संख्येने या. यामध्ये युवक, महिलांनाही सहभागी करून घ्या. गाफील राहू नका. विदर्भ, मराठवाडा, खानदेशात मोठ्या सभा झाल्या आहेत. आपलीही सभा रेकॉर्डब्रेक झाली पाहिजे, असेही पाटील म्हणाले.

राजारामनगर येथे हल्लाबोल सभेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आमदार जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अण्णासाहेब डांगे, दिलीपराव पाटील, विजयराव पाटील उपस्थित होते.

Web Title:  Make an unforgettable attack meeting: Jayant Patil - organized a meeting on 5th of the Islampur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.