मालगाव पाणी योजना आर्थिक संकटात-पाणीपट्टीची थकबाकी ८४ लाखांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 11:49 PM2019-02-02T23:49:16+5:302019-02-02T23:49:41+5:30
मालगाव (ता. मिरज) ग्रामपंचायतीने ११ कोटी ६८ लाख रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजना करूनही, पाणीपट्टीचे थकीत ८४ लाख आणि महावितरणचे वीज बिल ३५ लाख थकीत असल्याने योजनाच आर्थिक संकटात सापडली आहे. नागरिकांकडील थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी ग्रामपंचायतीने पाणी पुरवठ्याची कनेक्शन्स बंद करण्याची कारवाई सुरु
अण्णा खोत ।
मालगाव : मालगाव (ता. मिरज) ग्रामपंचायतीने ११ कोटी ६८ लाख रुपये खर्च करून पाणी पुरवठा योजना करूनही, पाणीपट्टीचे थकीत ८४ लाख आणि महावितरणचे वीज बिल ३५ लाख थकीत असल्याने योजनाच आर्थिक संकटात सापडली आहे. नागरिकांकडील थकीत पाणीपट्टी वसुलीसाठी ग्रामपंचायतीने पाणी पुरवठ्याची कनेक्शन्स बंद करण्याची कारवाई सुरु केली आहे. पण, यासही नागरिकांचा फारसा प्रतिसाद नसल्याचे दिसत आहे.
शासनाच्या राष्ट्रीय पेयजल योजनेतून मालगाव ग्रामपंचायतीने ११ कोटी ६८ लाख रुपये खर्च करुन पाणी पुरवठा योजना राबविली आहे. या योजनेमुळे शुध्द पाणी पुरवठ्याची सोय झाली आहे. महावितरणचा विजेचा दरही जादा असल्यामुळे वसूल होणाऱ्या पाणीपट्टीत योजना चालविणे ग्रामपंचायतीसमोर मोठे आव्हान आहे. याचबरोबर अनेक कुटुंबियांनी पाणी पुरवठ्याचे कनेक्शनच घेतलेले नाही. मालगावची लोकसंख्या ४० हजार असूनही गावांमध्ये केवळ १४७५ जणांनी पाणी कनेक्शन्स घेतली आहेत. यापूर्वीच्या ग्रामविकास अधिकाºयांनी वसुलीकडे दुर्लक्ष केल्याने सध्या चालूसह जुनी पाणीपट्टी ८४ लाखांवर पोहोचली आहे. या योजनेच्या थकीत वीज बिलाचा आकडाही दिवसेंदिवस वाढत असून सध्या ३५ लाखांची थकबाकी झाली आहे. पाणीपट्टीची वसुली नसल्याने पाणी योजनेला ग्रहण लागले आहे.
वीज बिल थकबाकीमुळे महावितरणने वसुलीच्या नोटिसा ग्रामपंचायतीला बजावल्या आहेत. थकीत पाणीपट्टीच्या ८४ लाख रुपये थकबाकीपैकी वसुली मोहिमेत ७० हजार रुपयांची वसुली झाली आहे. या रकमेतून चालूचे वीज बिल भरल्यामुळे वीज परवठा खंडितचा धोका टळला आहे. ग्रामपंचायतीच्या प्रयत्नामुळे योजनेचा वीज पुरवठा खंडित झाला नसल्यामुळे गावाला पाणी पुरवठ्याची टंचाई नाही. असे असले तरी थकीत वीज बिलासाठी महावितरणच्या अधिकाºयांकडून मालगाव पाणी योजनेचा वीज पुरवठा कोणत्याहीक्षणी खंडित होण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायतीने कठोर पाऊल उचलत पाणीपट्टीची थकबाकी असलेल्यांची कनेक्शन्स तोडण्याची गरज आहे. थकीत पाणीपट्टी वसुलीच्या मोहिमेत ३० ते ४० पाणी पुरवठ्याची कनेक्शन्स ग्रामपंचायतीने बंद केली आहेत. यापुढेही कारवाईची मोहिम राबविण्यात येणार असल्याचे प्रदीप सावंत यांनी सांगितले.
थकबाकीचा बोजा : घरावर चढवण्यात येणार
योजना चालविताना देखभाल, दुरूस्ती व वीज बिलासाठी तरतूद ही पाणीपट्टीच्या वसुलीवर अवलंबून आहे. सद्यस्थितीला वीज बिल सुमारे ३५ लाख
थकीत बिलाची वसुली न झाल्यास त्याचा वाईट परिणाम योजनेवर होण्याची शक्यता असल्याने वसुलीसाठी नळ कनेक्शन्स खंडित करण्याची मोहीम सुरु आहे. थकबाकी न भरणाºयांच्या घरावर थकबाकीचा बोजा चढविण्यात येणार आहे. ग्रामस्थांनी याची दखल घेऊन पाणीपट्टी भरण्याचे आवाहन गटनेते प्रदीप सावंत, सरपंच असलम मुजावर व ग्रामविकास अधिकारी डी. आर. शिंदे यांनी केले आहे.
सहकार्य करावे
वसुलीसाठी ग्रामपंचायतीने नळकनेक्शन खंडीत करण्याची मोहीम राबविली आहे. पाणी योजना टिकविण्यासाठी ग्रामस्थांनी पाणीपट्टी व घरपट्टी भरणे आवश्यक आहे. कर वसुलीसाठी ग्रामविकास अधिकाºयांना अधिकार दिल्याचे सरपंच असलम मुजावर यांनी सांगितले.