सांगलीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारा पोलिसांच्या जाळ्यात; एटीएमचे अडीच लाखांचे केले नुकसान

By शरद जाधव | Published: December 2, 2023 02:56 PM2023-12-02T14:56:55+5:302023-12-03T15:39:28+5:30

आठ तासात गुन्ह्याचा छडा

Man trying to break ATM in Sangli caught by police; 2.5 lakhs damage to ATM | सांगलीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारा पोलिसांच्या जाळ्यात; एटीएमचे अडीच लाखांचे केले नुकसान

सांगलीत एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणारा पोलिसांच्या जाळ्यात; एटीएमचे अडीच लाखांचे केले नुकसान

सांगली : शहरातील वखारभाग परिसरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यास पोलिसांनी जेरबंद केले. चेतन अशोक पुजारी (वय २५, रा. वाल्मीकी आवास, जुना बुधगाव रोड, सांगली) असे संशयिताचे नाव आहे. आठ तासात पोलिसांनी तपास करत संशयिताला ताब्यात घेतले. 

शहरातील वखारभागात सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे एटीएम आहे. शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास संशयित चेतन पुजारी एटीएममध्ये घुसला व त्याने चोरीच्या उद्देशाने मशिनचा डिस्प्ले, सीसीटिव्ही कॅमेरे, कॅश मशिनचा दरवाजा, बॅक रूमला असलेला दरवाजाचे कुलूप तोडून अडीच लाख रुपयांचे नुकसान केले होते.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक गुन्ह्याचा तपास करत होते. यावेळी पथकाला माहिती मिळाली की, संशयित हा वाल्मीकी आवासमध्ये येणार आहे. त्यानुसार पथकाने त्या भागात निगराणी ठेवली होती. यावेळी संशयित तिथे आढळून आला. त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. संशयित पुजारी याच्याकडून यासह इतरही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सांगली शहरचे निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखशली उपनिरीक्षक महादेव पोवार, संदीप पाटील, विनायक शिंदे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Man trying to break ATM in Sangli caught by police; 2.5 lakhs damage to ATM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.