शहरातील घंटागाड्यांचा कारभार बेभरोशाचा; व्यवस्थापनाचा कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:25 AM2020-12-29T04:25:53+5:302020-12-29T04:25:53+5:30

सांगली : महापालिका क्षेत्रात दररोज २१० टन कचरा उठाव होते. पण हा कचरा उचलण्यासाठी आवश्यक यंत्रणा अद्यापही अपुरी ...

The management of the city's bell trains is unreliable; Waste of management | शहरातील घंटागाड्यांचा कारभार बेभरोशाचा; व्यवस्थापनाचा कचरा

शहरातील घंटागाड्यांचा कारभार बेभरोशाचा; व्यवस्थापनाचा कचरा

Next

सांगली : महापालिका क्षेत्रात दररोज २१० टन कचरा उठाव होते. पण हा कचरा उचलण्यासाठी आवश्यक यंत्रणा अद्यापही अपुरी आहे. जवळपास ९६ वाहने या कामासाठी असली तरी उपनगरात मात्र दोन ते तीन दिवस नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे घंटागाड्यांचा कारभार बेभरोशाचा बनला आहे.

महापालिकेने कचरा उठाव करणाऱ्या वाहनांवर जीपीएसची यंत्रणा बसविली आहे. पण अनेक भागात रिक्षा घंटागाड्याच पोहोचत नसल्याने ही यंत्रणाही कुचकामी ठरत आहे. २०१३ पासून महापालिकेने जीपीएसची यंत्रणा स्वीकारली. पण ती कितपत यशस्वी ठरली, याविषयी आजही साशंकता आहे. दररोजचा कचरा उचलण्यातही यंत्रणा कमी पडत आहे. आता नव्याने साडेअकरा कोटींची वाहने खरेदी केली जाणार आहेत. पण तरीही कचऱ्याचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता कमीच आहे.

वॉच ठेवण्यासाठी जीपीएस यंत्रणा

महापालिकेकडील जुन्या ट्रक व टिपर वगळता इतर वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आली आहे. यात काॅम्पॅक्टर, रिक्षा घंटागाडीचा समावेश आहे.

या जीपीएस यंत्रणेवर सिस्टिम मॅनेजर, स्वच्छता निरीक्षक, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षकांचे नियंत्रण असते. वाहन थांबल्यास तातडीने ॲपवर अधिकाऱ्यांना संदेश मिळतो.

प्रक्रिया नाहीच, केवळ साठा

सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरात दररोज २१० टन कचरा जमा होतो. त्यापैकी १८० टन कचरा दररोज उचलला जातो. हा कचरा महापालिकेच्या समडोळी व बेडग रोडवरील डेपोवर नेऊन टाकला जातो. सध्या या दोन्ही डेपोवर जवळपास ४० लाख टन कचरा पडून आहे.

या कचऱ्यावर अद्याप प्रक्रिया करणारी यंत्रणा उभी राहू शकलेली नाही. दररोजचा कचरा उचलायचा आणि डेपोवर नेऊन टाकायचा इतकेच काम सध्या महापालिकेकडून सुरू आहे.

महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पाचे काम सुरू आहे. लवकरच त्याबाबत योग्य तो निर्णय होईल. सध्या कचरा उचलण्यासाठी वाहनांची संख्या अपुरी आहे. त्यासाठीच नव्याने वाहने खरेदी केली जाणार आहे. त्याला महासभेनेही मान्यता दिली आहे. रिक्षा घंटागाड्या घरोघरी पोहोचाव्यात, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. नवीन वाहनखरेदीत रिक्षा घंटागाड्यांचाही समावेश केला आहे. त्यामुळे हा प्रश्न बऱ्यापैकी सुटेल

-डाॅ. रवींद्र ताटे, आरोग्य अधिकारी, महापालिका

Web Title: The management of the city's bell trains is unreliable; Waste of management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.