औदुंबर मंदिराचे व्यवस्थापन देवस्थान सुधार समितीकडे : वादावर तोडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 12:10 AM2018-06-21T00:10:45+5:302018-06-21T00:10:45+5:30

 Management of the temple of the temple of the temple: Devasthan Reforms Committee | औदुंबर मंदिराचे व्यवस्थापन देवस्थान सुधार समितीकडे : वादावर तोडगा

औदुंबर मंदिराचे व्यवस्थापन देवस्थान सुधार समितीकडे : वादावर तोडगा

googlenewsNext
ठळक मुद्देदानपेटीतील ७५ टक्के रक्कम परिसर विकासासाठी

अंकलखोप : औदुंबर (ता. पलूस) येथील श्री दत्त मंदिरातील व्यवस्थापन पुजाऱ्यांकडून काढून श्री दत्त देवस्थान सुधार व्यवस्थापन समितीकडे देण्याचे सर्वसंमतीने मान्य करण्यात आले.औदुंबर देवस्थानशी संबंधित विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी ग्रामस्थ व पुजाºयांची बैठक झाली. या बैठकीत दत्त मंदिर परिसरातील दानपेटीतील रकमेपैकी २५ टक्के रक्कम पुजारी व देवस्थानच्या पूजाअर्चेसाठी, तर ७५ टक्के रक्कम मंदिर परिसर सुधार समितीला देण्याचा निर्णय घेण्यात आला. या रकमेतून मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे. सुधार समिती १ जुलैपासून कारभार सुरू करणार आहे.

भाविकांनी व्यवस्थापन समितीची अधिकृत पावती घेतल्याखेरीज कोणतीही देणगी वा दक्षिणा देऊ नये, असे आवाहन सरपंच अनिल विभुते यांनी केले. हे सर्व पुजाºयांनी मान्य केले. तसेच मंदिर परिसरातील ओवरींची कुलपे काढण्याचेही यावेळी पुजाºयांनी मान्य केले. या सुधार समितीत गावातील ३५ ते ४५ वयोगटातील युवकांना संधी देण्याचे ज्येष्ठ मंडळींनी मान्य केले. युवकांना संधी दिल्यामुळे मंदिर व परिसराचा विकास चांगला होईल, असे मत पी. पी. पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

बैठकीस विकास सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब मगदूम, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्तात्रय सूर्यवंशी, धनंजय सूर्यवंशी, प्रा. पी. पी. पाटील, प्रशांत सूर्यवंशी, उपसरपंच मच्छिंद्र गडदे, ए. के. चौगुले, विशाल सूर्यवंशी, पुरूषोत्तम जोशी, संजय जोशी, रमेश जोशी, अविनाश सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

स्वच्छता कर्मचारी, सुरक्षारक्षक नेमणार
नदी घाटावर येणाºया महिला भाविकांना कपडे बदलण्यासाठी एका महिन्यात खोली बांधून देण्याचे पुजारी वर्गाकडून मान्य करण्यात आले. तसेच मंदिर परिसरात स्वच्छतेसाठी कर्मचारी नेमण्याचा, सुरक्षारक्षक नेमण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

Web Title:  Management of the temple of the temple of the temple: Devasthan Reforms Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.