वानलेसवाडीत हिसडा मारून मंगळसूत्र लांबविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:50 AM2020-12-17T04:50:23+5:302020-12-17T04:50:23+5:30
सांगली : शहरातील वानलेसवाडी परिसरात घरासमोर थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील १० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसडा मारुन लांबविण्यात आले. याप्रकरणी ...
सांगली : शहरातील वानलेसवाडी परिसरात घरासमोर थांबलेल्या महिलेच्या गळ्यातील १० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसडा मारुन लांबविण्यात आले. याप्रकरणी भाग्यश्री राजेश पवार (रा. ढेरे मळा, वानलेसवाडी) यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी किरण पुंडलिक कांबळे (रा. धनगर गल्ली, वानलेसवाडी) या संशयितास अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवार, दि. ११ रोजी दुपारी तीनच्यासुमारास फिर्यादी भाग्यश्री पवार या घराजवळ थांबल्या असताना, संशयिताने मंगळसूत्राला हिसडा मारला व ते घेऊन पसार झाला. पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर उपअधीक्षक अजित टिके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांचे पथक तपास करत असतान, त्यांनी संशयित कांबळे यास ताब्यात घेतले आहे.