मांगले - सावर्डे दरम्यानचा बंधारा पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:19 AM2021-06-18T04:19:39+5:302021-06-18T04:19:39+5:30
मांगले : मांगले (ता. शिराळा) परिसरात चोवीस तासात १३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वारणा नदीवरील मांगले - सावर्डे ...
मांगले : मांगले (ता. शिराळा) परिसरात चोवीस तासात १३५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वारणा नदीवरील मांगले - सावर्डे दरम्यानचा बंधारा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.
मांगले, सागाव परिसरात बुधवारी रात्री अतिवृष्टी झाली. या पावसामुळे वारणा, मोरणा नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडून वाहात आहे. खरीप पेरणी केलेल्या शिवारात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले आहे. ओढे - नाले भरून वाहू लागले आहेत. वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. दिवसभर मुसळधार पावसाच्या सरी पडत होत्या. शेतात पाणी साठल्यामुळे शेतकऱ्यांची कामे ठप्प झाली आहेत. काही ठिकाणी शेतात जाणाऱ्या रस्त्यावरूनही पाणी साचल्यामुळे रस्ते बंद आहेत.