शिराळ्यात झाडाला ६०० ग्रॅम वजनाचा आंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:27 AM2021-05-27T04:27:48+5:302021-05-27T04:27:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : येथील सुगंधानगर कॉलनीतील अशोक रंगराव नलवडे यांच्या घरासमोरच्या आंब्याच्या बागेतील झाडांना तब्बल ६०० ग्रॅम ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : येथील सुगंधानगर कॉलनीतील अशोक रंगराव नलवडे यांच्या घरासमोरच्या आंब्याच्या बागेतील झाडांना तब्बल ६०० ग्रॅम वजनाचे आंबे लगडले आहेत. अशोक नलवडे यांच्या घरी आंबे पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे.
नलवडे यांच्या घराजवळ असणाऱ्या बागेत हापूस आंब्याची पाच झाडे आहेत. या झाडांचे वय १५ वर्षे पूर्ण झाले आहे. या झाडाला वर्षातून दोन वेळेला मोहर येऊन फळधारणा होते. यातील एका आंब्याच्या नगाचे वजन ६०० ग्रॅम भरते. एका झाडाला सरासरी २५० आंबे लागतात. कोणत्याही प्रकारची औषध फवारणी न करता नैसर्गिक पद्धतीने या झाडांची वाढ झाली आहे. मोहर आल्यानंतरदेखील आंब्यांची वाढ ते पिकेपर्यंत नैसर्गिकरीत्या जोपासना केली जाते. आता ६०० ग्रॅम वजनाचे आंबे लगडले आहेत. नागरिक कुतूहलापोटी आंबे पाहण्यास येत असल्याचे त्यांनी सांगितले.