मानसिंग बँकेच्या यशाची घोडदाैड कायम राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:28 AM2021-09-27T04:28:15+5:302021-09-27T04:28:15+5:30
फोटो ओळी : दुधोंडी (ता. पलुस) येथील मानसिंग बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेचे संस्थापक जे. के. बापू जाधव यांनी ...
फोटो ओळी : दुधोंडी (ता. पलुस) येथील मानसिंग बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेचे संस्थापक जे. के. बापू जाधव यांनी मार्गदर्शन केले.
दुधोंडी : मानसिंग बँकेने तज्ज्ञ संचालक मंडळ व कुशल कर्मचाऱ्यांच्या जोरावर आजवर काम केले आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमांचे तंतोतंत पालन करीत सभासदांचे हित जोपासत २५ व्या वर्षात यशस्वीरीत्या पदार्पण केले आहे. यापुढेही नवनवीन बदलांना सामोरे जात अशीच प्रगतीची घोडदौड सुरू राहील, असे प्रतिपादन मानसिंग बँकेचे संस्थापक जे.के. बापू जाधव यांनी केले.
दुधोंडी (ता. पलूस) येथील मानसिंग बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. या वेळी सभासदांना १० टक्के लाभांश त्यांनी जाहीर केला. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष सुधीर जाधव होते. उपाध्यक्ष शीतल सावळवाडे उपस्थित होते.
दुधोंडी शाखेचे शाखाधिकारी प्रकाश आरबुने यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. बँकेच्या प्रगतीचा आढावा अध्यक्ष सुधीर जाधव यांनी सांगितला. व्यवस्थापक हनमंत महाडिक यांनी अहवाल वाचन केले.
या वेळी ॲड. सचिन पाटील, सरोजनी पाटील, मीनाक्षी देवी क्रेडिट सोसायटीचे संस्थापक क्रांतीकुमार जाधव, उमेश लाड, बाळासो कदम, दौलतराव लोखंडे, रमेश राजमाने, हनमंत कारंडे, सुभाष शितोळे, अमजद मुजावर, मधुकर धनवडे आदी मान्यवर उपस्थित होते. अजित सूर्यवंशी यांनी आभार मानले.