मानसिंगराव नाईक करणार २५ ऑक्सिजन बेडचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:44 AM2021-05-05T04:44:29+5:302021-05-05T04:44:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : आमदार मानसिंगराव नाईक यांनी आमदार फंड न वापरता उपजिल्हा रुग्णालयात तातडीने २५ ऑक्सिजन बेड ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : आमदार मानसिंगराव नाईक यांनी आमदार फंड न वापरता उपजिल्हा रुग्णालयात तातडीने २५ ऑक्सिजन बेड वाढवण्याच्या सूचना देऊन हा सर्व खर्च स्वतः करणार असल्याचे सांगितले.
येथील उपजिल्हा रुग्णालयास आमदार नाईक यांनी भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांनी बेडची संख्या तातडीने ७५ वरून १०० करण्याची सूचना केली.
ते म्हणाले की, वाढणाऱ्या २५ बेडसाठी लागणाऱ्या साहित्याची व्यवस्था मी स्वतः करणार आहे. बेडसाठी लागणाऱ्या ऑक्सिजन पाईपलाईनची जोडणी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने पूर्ण करावी. उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन बेडची संख्या १०० होणार आहे.
यावेळी प्रांताधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, वैद्यकीय अधीक्षक डॉ. जुबेर मोमीन, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पाटील आदी उपस्थित होते.
चौकट
आमदार नाईक यांनी सांगितले की, शासनाकडून मदत येत आहे; मात्र आपलेही कर्तव्य आहे. रुग्ण वाढत आहेत. आवश्यकता लागल्यावर व्यवस्था करण्यापेक्षा अगोदरच केली पाहिजे. रुग्णांना ऑक्सिजनचे बेड कमी पडू नयेत यासाठी वाढीव २५ बेडची व्यवस्था करत आहे.