एफआरपीची मोडतोड करणाऱ्या कारखानदारांना अद्दल घडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:22 AM2021-01-14T04:22:24+5:302021-01-14T04:22:24+5:30

ऐतवडे बुद्रुक : उसाच्या एफआरपीमध्ये मोडतोड करणाऱ्या साखर कारखानदारांना अद्दल घडवणार, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ...

The manufacturers who break the FRP will be punished | एफआरपीची मोडतोड करणाऱ्या कारखानदारांना अद्दल घडविणार

एफआरपीची मोडतोड करणाऱ्या कारखानदारांना अद्दल घडविणार

Next

ऐतवडे बुद्रुक : उसाच्या एफआरपीमध्ये मोडतोड करणाऱ्या साखर कारखानदारांना अद्दल घडवणार, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. ते ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथील सभेत बोलत होते.

राजू शेट्टी म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी एफआरपीमध्ये कोणतीही मोडतोड न करता सरसकट पहिली उचल पूर्ण केली, मात्र सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी एकरकमी एफआरपी द्यायचा निर्णय घेतला, मात्र चार कारखान्यांनी पूर्ण रक्कम जमा केली.

ते म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रस्त्यावर उतरून संघर्ष सुरू केला आहे. सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या नावावर खोट्या सह्या करून एफआरपीमध्ये मोडतोड केली आहे. हे कदापि खपवून घेणार नाही, आम्ही शेतकऱ्यांच्या सह्याची मोहीम चालू करून साखर कारखान्याचे विरोधात खोटी कागदपत्रे साखर आयुक्तांना सादर करून हे सगळे करार केलेले बोगस आहेत, बोगस सह्या करून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न या साखर-कारखाने करत आहेत.

यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष भागवत जाधव, प्रा. अरुण घोडके, एस. यू. संदे, उपसरपंच अशोक दिंडे, सौरभ पाटील, विद्यार्थी परिषदेचे उदय गायकवाड, मौला मुल्ला, हर्षद बुद्रुक, किरण पाटील, संभाजी घोडके, शीतल पाटील उपस्थित होते.

फोटो - १३०१२०२१-आयएसएलएम-ऐतवडे बुद्रुक न्यूज

ऐतवडे बुद्रुक (ता. वाळवा) येथील सभेत माजी खासदार राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भागवत जाधव, प्रा. अरुण घोडके, अशोक दिंडे उपस्थित होते.

Web Title: The manufacturers who break the FRP will be punished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.