'कोरोनाच्या नावाखाली अनेक लोक मारले, कोरोना व जागतिक आरोग्य संघटना बोगस'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2021 04:42 PM2021-12-01T16:42:17+5:302021-12-01T16:42:57+5:30

कालीपूत्र कालीचरण महाराज यांनी उधळली मुक्तांफळे. जागतिक आरोग्य संघटना व लस तयार करणाऱ्या कंपन्यांची मिलीभगत असून त्यातून लोकांची फसवणूक करत असल्याचा केला आरोप.

'Many killed under Corona's name, Corona and WHO bogus' | 'कोरोनाच्या नावाखाली अनेक लोक मारले, कोरोना व जागतिक आरोग्य संघटना बोगस'

'कोरोनाच्या नावाखाली अनेक लोक मारले, कोरोना व जागतिक आरोग्य संघटना बोगस'

Next

सांगली : जगात कोरोनाच्या नावाखाली भीती निर्माण करुन अनेक लोक मारण्यात आले. कोरोना व जागतिक आरोग्य संघटना बोगस आहेत, असे वक्तव्य कालीपूत्र कालीचरण महाराज यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत केले.

ते म्हणाले की, कोरोनाची लक्षणे किरकोळ स्वरुपाची आहेत. कोरोना ही कोणतीही महामारी नाही. महामारीत लोक पटापट मरतात. परंतु, कोरोनापासून वाचण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने लस घेण्याचे आवाहन केले. ही संघटना व लस तयार करणाऱ्या कंपन्यांची मिलीभगत असून त्यातून लोकांची फसवणूक होत आहे. रेमडेसिवीर इंजक्शनही बोगस आहे. असे अनेक आरोप देखील त्यांनी केले.

हिंदुंनी व्होट बँक तयार करावी

हिंदुत्ववादाबद्दल ते म्हणाले की, देशातील हिंदू हा भाषावाद आणि जातीयवादावर विभागला आहे. संपूर्ण देशावर राज्य करायचे असेल तर सर्व हिंदुंनी एकत्र येऊन व्होट बँक तयार करावी. देशासह जगावर हिंदू राष्ट्र व्हावे, अशी छत्रपती शिवाजी महाराज यांची इच्छा होती. जगात सनातन हिंदू धर्म हाच श्रेष्ठ आहे. परंतु, हिंदू धर्मात काही विघटक आहेत. त्यांना साफ करणे गरजेचे आहे. हा देश संपूर्ण हिंदूचा होणे गरजेचे आहे आणि देशातील तरुण ते करतील.

हिंदू धर्मासाठी काम करणे सोडून ..

पंतप्रधान नरेंद्र मोदीच देशाचा विकास करीत आहेत. त्यांना आमचा पाठिंबा राहील. इतिहासात हिंदुंवर झालेला अन्याय पटवून देणे आवश्यक आहे. परंतु, अनेकजण हिंदू धर्मासाठी काम करणे सोडून जातीसाठी माती खाण्याचा उद्योग करीत आहेत, असे ते म्हणाले. यावेळी शिवप्रतिष्ठान युवा हिंदूस्थानचे संस्थापक नितीन चौगुले व कार्यकर्ते उपस्थित होते.

याआधीही कोरोना महामारीवर आणि लसीवर अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित होत होते. अनेक महाशयांनी तर हा विषाणूच नसल्याची मुक्तांफळे उधळली होती. यात आता कालीपूत्र कालीचरण महाराज यांची भर पडली आहे.

Read in English

Web Title: 'Many killed under Corona's name, Corona and WHO bogus'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.