आयर्विन पुलावर घोंगावले मराठा वादळ
By admin | Published: September 27, 2016 10:47 PM2016-09-27T22:47:00+5:302016-09-28T00:23:11+5:30
सांगलीत क्रांती मोर्चा : सांगली-पेठ मार्गावर ६० हजार वाहने धावली; वाहतुकीची कोंडी
कसबे डिग्रज : सांगलीत आयोजित मराठा मोर्चासाठी मंगळवारी अभूतपूर्व ऐतिहासिक गर्दी झाली होती. सांगली-पेठ या राज्यमार्गावरून शिराळा तालुक्यातील मणदूर-कणदूरपासून वाळवा तालुका आणि मिरज पश्चिम भागातील सुमारे साठ हजार वाहने सांगली-पेठ मार्गावरून धावली. तसेच त्यामधून आलेल्या सहा लाख जनसमुदायाचे ‘मराठा भगवे वादळ’ सांगलीतील आयर्विन पुलावरून चालत सांगलीत दाखल झाले.
सकाळी सात वाजल्यापासून परिसरातील स्वयंसेवक गटा-गटाने दुचाकीवरून येत होते. त्यानंतर आठपासून मोठ्या प्रमाणात जीप, ट्रॅक्स, टेंपो, लक्झरी बसेस यांसह अग्निशमन वाहनांमधूनही मोठ्या प्रमाणात मराठा तरुणाई मोर्चात सहभागी होण्यास येत होती. यामध्ये मोर्चाला जाणाऱ्यांची स्वयंशिस्त वाखाणण्याजोगी होती. स्वयंसेवकांच्या सूचनेला चांगला प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे पोलिसांवर ताण नव्हता. सांगली बायपास टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाली होती. (वार्ताहर)
01 कसबे डिग्रज येथील बलुतेदार समाजाने केळी वाटप केले. याचा स्वीकार विनम्रपणे माजी जि. प. उपाध्यक्ष सत्यजित देशमुख, शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांच्यासह सुमारे ४० हजार मोर्चेकरांनी केला.
02आयर्विन पुलावरून सकाळी साडेआठ ते ११ पर्यंत सहा लाख अबाल-वृद्ध मराठा नागरिक, महिला, मुली चालत सहभागी झाल्या होत्या.
03राजारामबापू फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी येताना मेसमधून जेवण सोबत आणले होते. त्यामध्ये संतोष मगर (हिंगोली), रवींद्र गवारे (अहमदनगर) यांच्यासह जिल्ह्याबाहेरील ३० विद्यार्थी होते.
04लक्ष्मी फाटा ते टोलनाका सांगली मार्गावर दोन्ही बाजूने वाहनांची सुमारे चार किलोमीटर लांब रांग.