Sangli: मराठा आंदोलकांनी बेडगमध्ये जिल्हाधिकाऱ्यांची गाडी रोखली, भेटीसाठी उपोषणकर्त्याला बेडसह आणले उचलून

By हणमंत पाटील | Published: November 1, 2023 03:51 PM2023-11-01T15:51:52+5:302023-11-01T15:53:07+5:30

जिल्हाधिकारी यांनी भेट देण्यास नकार दिल्याने बेडग, आरगमधील मराठा समाज आक्रमक

Maratha protesters block Collector car in Bedg Sangli | Sangli: मराठा आंदोलकांनी बेडगमध्ये जिल्हाधिकाऱ्यांची गाडी रोखली, भेटीसाठी उपोषणकर्त्याला बेडसह आणले उचलून

Sangli: मराठा आंदोलकांनी बेडगमध्ये जिल्हाधिकाऱ्यांची गाडी रोखली, भेटीसाठी उपोषणकर्त्याला बेडसह आणले उचलून

बेडग : बेडग येथे सध्या प्रकाश वाळेकर यांचे मागील चार दिवसांपासून आमरण उपोषण तसेच सहा दिवसांपासून साखळी सुरू आहे. दरम्यान बुधवारी (दि. १) रोजी जिल्हाधिकारी हे म्हैसाळ कालवा टप्पा क्रमांक ३ येथे आल्याचे समजताच बेडग मधील सकल मराठा समाज मिरज आरग रस्त्यावर उपोषण ठिकाणी थांबले होते. जिल्हाधिकारी यांची गाडी छत्रपती संभाजी महाराज चौकात आल्यानंतर त्यांची गाडी अडविण्यात आली.

त्यावेळी मराठा समाजाने त्यांना चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरू असल्याने त्यांना भेट देण्याची विनंती केली, परंतु, जिल्हाधिकारी यांनी भेट देण्यास नकार दिल्याने, बेडग व आरग मधील मराठा समाज आक्रमक झाला. आमरण उपोषण करणाऱ्या व्यक्तीस गाडी जवळ न्यावे लागले.

जिल्हाधिकारी यांनी गाडीतून उतरून येण्यास नकार दिला. त्यामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले. अखेर जिल्हाधिकारी हे गाडीतून खाली उतरले परंतु, आमरण उपोषण करणाऱ्या व्यक्तीस बेडसह जिल्हाधिकारी यांच्या गाडी जवळ उचलून न्यावे लागले. 

Web Title: Maratha protesters block Collector car in Bedg Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.