मराठा आंदोलकांनी टायर पेटवून सांगली-इस्लामपूर रस्ता रोखला
By संतोष भिसे | Published: October 31, 2023 05:43 PM2023-10-31T17:43:07+5:302023-10-31T17:43:28+5:30
कसबे डिग्रज : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे मराठा आंदोलकांनी मंगळवारी सकाळी सांगली - इस्लामपूर रस्त्यावर जोरदार आंदोलन केले. ...
कसबे डिग्रज : कसबे डिग्रज (ता. मिरज) येथे मराठा आंदोलकांनी मंगळवारी सकाळी सांगली - इस्लामपूर रस्त्यावर जोरदार आंदोलन केले. रस्त्यावर टायर पेटवून व बॅरीकेडसवे लावून रास्ता रोको केले. शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.
सकाळी अकरा वाजता स्वागत कमानीसमोर आंदोलन केले. मराठा आरक्षणासाठी गावात पाच दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे. मशाल मोर्चामध्ये सुमारे दोन हजार महिला, पुरुष सहभागी झाले होते. राज्य सरकारच्या विरोधात प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेधही नोंदविण्यात आला. सकल मराठा समाजातीने गावात सर्वपक्षीय नेत्यांना प्रवेश बंदी केली आहे. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरुच असा इशारा दिला आहे.
मंगळवारी सकाळी तरुण वर्ग अचानक सांगली - इस्लामपूर मार्गावर आला. घोषणाबाजी सुरु केली. टायर पेटवून रास्ता रोको केला. सांगली ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी गायकवाड फौजफाट्यासह आंदोलनस्थळी आले. त्यांनी तरुणांची समजूत काढली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. वाहतूक सुरळीत झाली.