मराठा आरक्षण: सांगलीतील 'या' गावाने घेतला सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 06:09 PM2023-09-06T18:09:20+5:302023-09-06T18:10:50+5:30
नेत्यांनाही गावबंदीचे निवेदन प्रशासनाला देण्याचे ठरले
भिलवडी : मराठा आरक्षण मिळेपर्यंत सर्वपक्षीय नेत्यांना धनगाव (ता. पलूस) गावात प्रवेश दिला जाणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. भविष्यातील सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचाही निर्णय घेतला.
जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी मंगळवारी निषेध फेरी काढली. शिवतीर्थावर सभा झाली. सरपंच सतपाल साळुंखे, सेवा संस्थेचे अध्यक्ष दीपक भोसले, दत्ता उतळे, रवींद्र साळुंखे, आनंदराव उतळे, अरविंद साळुंखे, कुमार सव्वाशे, राज साळुंखे, जयदीप यादव आदींनी भूमिका मांडली. निवडणुकीवर बहिष्कार व नेत्यांना गावबंदीचे निवेदन प्रशासनाला देण्याचे ठरले.
यावेळी पोलिस पाटील मनीषा मोहिते, सुरेश साळुंखे, अनिल साळुंखे, रमेश पाटील, शरद साळुंखे, सुनील भोसले, सुनील मोहिते, माणिक तावदर, शैलेश साळुंखे, सौरभ पाटील, प्रशांत साळुंखे, शैलेश साळुंखे हेदेखील उपस्थित होते.