मराठी ज्ञानभाषा रोजगार निर्मितीची भाषा व्हावी : विलास काळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:49 AM2021-02-28T04:49:05+5:302021-02-28T04:49:05+5:30
ओळ : आष्टा महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनप्रसंगी प्राचार्य डॉ. विलास काळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कवी प्रदीप पाटील, ...
ओळ :
आष्टा महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिनप्रसंगी प्राचार्य डॉ. विलास काळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कवी प्रदीप पाटील, डॉ. राजाराम पाटील, डॉ. बी. के. माने, डॉ. विकास पाटील उपस्थित हाेते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : मराठी भाषेचे अस्तित्व अधिक बळकट करावयाचे असेल, तर मराठी भाषा ही ज्ञानभाषा, रोजगार निर्मितीची भाषा झाली पाहिजे, असे प्रतिपादन प्राचार्य डाॅ. विलास काळे यांनी केले.
आष्टा (ता. वाळवा) येथील आर्टस् अँड काॅमर्स काॅलेजच्या मराठी विभाग व वाङ्मय मंडळ यांच्यातर्फे आयोजित मराठी भाषा गौरवदिनप्रसंगी डॉ. काळे बोलत होते. यावेळी डाॅ. बी. के. माने, डाॅ. राजाराम पाटील, वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष कवी प्रदीप पाटील उपस्थित होते.
डॉ. काळे म्हणाले, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक क्षेत्रांमध्येही मराठीतून व्यवहार होणे ही काळाची गरज आहे.
प्रदीप पाटील म्हणाले, भाषेतून जीवनाचा आशय व्यक्त करणारी अभिजात निर्मिती आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये भाषेचा होणारा प्रभावी वापर या गोष्टी भाषेला समृद्ध बनवितात. भाषा समृद्ध असेल तरच जीवन समृद्ध होते.
डाॅ. राजाराम पाटील यांनी स्वागत केले. डाॅ. बी. के. माने यांनी आभार मानले. यावेळी डाॅ. विकास पाटील व विद्यार्थी उपस्थित होते.